महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.८:-भद्रावती शहरात डेंग्यूचा थैमानघातले असून डेंगू मुळे अनेक लोक आजारी असून भद्रावती शहरातील काही लोकांचे डेंगू मुळे जीव गेले आहे. त्यामुळे भद्रावती शहरातील संपूर्ण वार्डात नगरपरिषदेद्वारे धूरांड फवारणी व औषध फवारणी करण्यात यावी जेणेकरून भद्रावती शहरातील लोकांना डेंगू चे आजारापासून संरक्षण होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपरिषद चे हे कर्तव्यच आहे. यासाठी निवेदन देण्यात आले या निवेदनात युद्धपातळीवर संपूर्ण भद्रावती शहरातील प्रत्येक वार्डात धुरांडा व औषध फवारणी करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक नंदू पडाल, तालुका संघटक नरेश काळे, नगरसेवक राजूभाऊ सारंगधर, उपतालुकाप्रमुख बाळा शिरसागर ,युवा सेना तालुका समन्वयक घनश्याम आसवले, युवा सेना शहर समन्वयक गौरव नागपुरे, आशिष ठेंगणे, राहुल खोडे,येशू आर्गी, सतीश आत्राम, मयुर शेडामे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते