पातूर पोलिसांना यश मोबाईल धारकांना मोबाईल केले परत
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, पातूर
पातुर : पातुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल हरविल्याची शृंखला सुरू होती मात्र हरविलेल्या मोबाईलच्या शोध घेण्याकरता पातुर पोलिसांचा सतत प्रयत्न सुरू होता अखेर या प्रयत्नाला यश मिळाले आणि अर्जदारांना पातुर पोलीस स्टेशन मध्ये बोलावून त्यांना मोबाईल परत करण्यात आले 06/ 08/ 2021रोजी मा पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांचे सूचना व आदेशान्वये पोलीस स्टेशन पातुर जे मोबाईल हरवलेले आहेत त्यांचा शोध घेऊन अर्जदारास परत देणे बाबत
अशा आदेशान्वये मा हरीश गवळी ठाणेदार पोलीस स्टेशन पातुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल मनिष घुगे ब नं 345 सोबत यांनी पोलीस स्टेशन पातुर
यांनी हा उपक्रम पार पडला आहे पातुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हरवलेले मोबाइल बाबत शोध मोहीम राबवून 06 मोबाईलचा शोध घेऊन मोबाईल किंमत एकूण 72000 रु चा मुद्देमाल आज दि 06/ 08 2021 रोजी पो. स्टे. ला येथे मिटिंग घेऊन मा.हरीश गवळी पोलीस निरीक्षक पो स्टे पातूर यांचे हस्ते सदर मोबाईल अर्जदारास परत देण्यात आले आहे.