रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
वाकान : ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच, उपसरपंच, ग्रां पं सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, तथा सर्व शालेय समिती सदस्य, यांच्या वतीने दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ग्रां पं कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधान निर्माता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच आश्वजीत भगत, उपसरपंच परेश राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करन्यात आले.यावेळी सरपंच यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा आणि त्यांच्या कारकिर्दीबाबत मनोभावना व्यक्त केली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली झाला.संविधान निर्माते डॉ भिमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ जातीवाद दुर करण्यासाठी तसेच गरीब दलीत आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले.आबेडकरांनी १९५६ साली बौध्द धर्माचा स्वीकार केला.आबेडकरांचे पुर्वज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत सैनिक होते.वडील ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार होते.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनाही शाळा शिकन्याची संधी मिळाली त्यामुळेच त्यांनी शिक्षणाला अधिक महत्त्व देत बालपणापासूनच आपला लढा सुरू ठेवला आणि यशाचे शिखर गाठुन भारतीय संविधानाची निर्मिती केली सर्व समाजासाठी कायदा सुव्यवस्थेचे मार्ग मोकळे केले.खरोखरच या महामानवांच्या कार्य कीर्तीची आठवण पीढीन पीढी कायमच राहील म्हणूनच १४ एप्रिल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती देशभरातच नव्हे तर जगभरात देखील साजरी केली जाते असे वाकान येथील सरपंच यांनी आपल्या वाक्तव्यातुन भावना व्यक्त केली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आवीनाश राठोड, उपसरपंच परेश राठोड,माजी उपसरपंच विलास मनवर, बुध्दोलीन भगत,बबलु मनवर,विकी भगत, सुनिल भगत, शुध्दोदन भगत, महेंद्र भगत,, मधुकर राठोड,(बंजारा क्रांतीदल अध्यक्ष) शालेय समिती उपाध्यक्ष पपु जाधव,मुख्याध्यापक श्री लांडगे सर,श्री खटारे सर, श्री राठोड सर,या सह सर्व शिक्षकरूंद प्रतिष्ठित नागरिक व ग्रा.प.पदाअधिकारी उपस्थित होते.


