कैलास श्रावणे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
वंचित बहुजन आघाडी मागणीपुसद: (प्रतिनिधी)मौजे सावरगाव तालुका पुसद येथे दिनांक २७ मार्च रोजी गावातील गावगुंडांनी एकत्र जमून बौद्ध वस्तीतील महिला पुरुष व युवकांना बेदम व अमाणूसपणे मारहाण केली यामुळे बौद्ध वसाहतीतील लोकांमध्ये प्रचंड दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.अनेक लोक आपला जीव मुठीत धरून गावामध्ये वावरत आहेत तेव्हा त्या गावांमध्ये जातीय सलोखा कायम राहावा व शांतता अबाधित रहावी यासाठी प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांतता बैठकीचे आयोजन करावे व बौद्ध वस्तीतील सर्व कुटुंबांना संरक्षण द्यावे त्याचबरोबर अत्याचार ग्रस्त कुटुंबांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी.के.दामोधर, पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, जिल्हा सचिव उत्तमराव ढोले, संदीप आढाव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, जयानंद भालेराव,आकाश पठाडे,प्रसाद खंदारे,बबन मनवर,राहुल कांबळे, सचिन मनवर, मधुकर सोनवणे. गौतम मनवर, ओम प्रकाश मनवर, उत्तम मनवर, नारायण मनवर ,राहुल पाईकराव ,राहुल इंगोले, सावरगाव सरपंच वनिता बरडे, वच्छला मनवर,कमल बलखंडे,गयाबाई पातोडे, विमलबाई इंगोले, वनिता मनवर,शांताबाई मनवर ,सयाबाई धुळधुळे कमल मनवर , सुजाता खिल्लारे, छाया कांबळे असे अनेक सावरगाव येथील लोकांची उपस्थिती होती.


