कैलास श्रावणे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाईयवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे अवैध शस्त्र अग्निशस्त्र बाळागणा.या तसेच अ उघड गुन्हे आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषध द्रव्यांची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक .मा. कुमार चिंता भा.पो.से यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून अ उघड गुन्हे उघड करून आरोपी शोध घेणे बाबत सूचना दिल्या आहेत. दिनांक ०२/०४/२०२५ रोजी स्थानिक गुन्हा शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे अ उघड गुन्हे मधील आरोपी शोध व माहिती काढन असतांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली कि दोन संशयीत इसम महागाव हदद्दीतून मोटर सायकल चोरी केली आहे व ती मोटर सायकल विक्री करण्याकरिता महागाव कडून यवतमाळ बाजूकडे येत असल्या बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने नमूद पथक मौजे खडका फाटा राजमाता जिजाऊ उडानपूल येथे सापळा रचला असता दोन संशयीत इसम दोन मोटरसायकल घेवुन येत असल्याचे दिसून आल्याने त्यांना थांबवुन त्याचे ताब्यातील मोटर सायकलची पाहणी केली असता ही.चोरीची असल्याचे कबूल केल्याने ती महागाव पोलीस स्टेशन अप क्रमांक १३८/२०२५ कलम ३०३(२) भान्यास मधील चोरीची असल्याचे खात्री झाल्याने इसम नामे_१) निलेश नामदेव जाधव वय २७ वर्ष.२) राहुल प्रभाकर बेले वय 30 वर्ष दोन्ही रा. आमणी (खुर्द)ता. महागाव जि.यवतमाळ यास ताब्यात घेवुन गुन्हयातीय मोटर सायकल क्रमांक MH -29BM-5974 तसेच शाईन मोटरसायकल क्रमांक MH -29-BA-2717 अशा दोन मोटर सायकल किंमत.१.४००.०००/रु जप्त करून सादर मोटार सायकल व इसम नामे _निलेश नामदेव जाधव वय २७ वर्ष.२) राहुल प्रभाकर बेले वय ३० वर्ष दोन्ही रा. आमणी.खुर्द ता. महागाव जि. यवतमाळ यांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन महागाव यांच्या ताब्यात दिले सादरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता सा.मा. अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ मा.पियुष जगताप सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड सा.मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा पोलीस निरक्षक गजानन गजभारे पोउपनि/शरद लोहकरे चापोउपनि /रवींद्र शिरामे.पोहवा/ संतोष भोरगे.पोहवा/तेजाब रणखांब. पोहवा/ सुभाष जाधव पोहवा. रमेश राठोड.पोहवा/ कुणाल मुंडोकार.पोशि/सुनील पंडागळे.चापोका/राजेश जाधव सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे


