रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
महात्मा फुले शिक्षण संस्था व्दारा संचालित सहदेवराव भोपळे विद्यालयातील विद्या र्थ्यांनी सन २०२४-२५ या सत्रातील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती एन.एम.एम.एस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहते.त्यापैकी ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून तेल्हारा तालुक्या त अग्रक्रम मिळविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षासाठी दरवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. यात चि. वरद पंकज अग्रवाल, ह्याने इडब्लूएस या प्रवर्गातून जिल्ह्यात दुसरा, चि. आर्यन धनराज गवई, अनु.जाती या प्रवर्गातून जिल्ह्यात दुसरा, चि.नयन राजेश तायडे, सर्व सामान्य प्रवर्गातून दहावा, चि.सार्थक संतोष आकोटे, सर्वसामान्य प्रवर्गातून पंधरावा, कु.श्रद्धा सुधीर राऊत,इतर मागास वर्गीय गटातून ३४ वा क्रमांक प्राप्त करून या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे.या सर्व विद्यार्थ्यां ना महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, कार्यवाह श्यामशील भोपळे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, संचालक प्रा. कौस्तुभ भोपळे,संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीचे सिनेट सदस्य डॉ.प्रशांत विघे,प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे, डॉ.योगेश पोहकार, डॉ.आशिष गवार तसेच सर्व शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक यांना देतात.


