पवनकुमार भोकरे तालुका प्रतिनिधी पाटोदा
दि २२ मार्च पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी गावाचे माजी सरपंच दीपक तांबे यांचे वडील श्री. केशव दादाराव तांबे (वय ८५) हे गेल्या अनेक दिवसांपासून विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी विशेष भेट दिली.या भेटीदरम्यान आमदार सुरेश धस यांनी केशव तांबे यांची तब्येतीची माहिती घेतली व त्यांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच, माजी सरपंच दीपक तांबे यांना वडिलांसाठी नियमित औषधोपचार, योग्य आहार व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले.या प्रसंगी आमदार सुरेश धस यांनी तांबे कुटुंबीयांना धीर देत केशव तांबे यांच्या लवकरात लवकर स्वास्थ्य लाभासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


