रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
येथिल अंकुर साहित्य संघ मुर्तिजापुर शाखेच्या 1996 च्या स्थापने पासून आपल्या साहित्य चळवळीला सुरुवात केलेल्याआकाश उर्फ अनिल डाहेलकर यांच्या 29 वर्षा च्या प्रदिर्घ साहित्य सेवेची दखल घेत त्यांना रविवार दि. 23 मार्च ला शुभंभ साहित्य मंडळाच्या संमेलनात गौर विण्यात आले.अंकुर साहित्य संघ , शिक्षक साहित्य संघ, कलाविष्कार साहित्य शिक्षण संस्था आणि स्थानि क काही साहित्य संघाच्या चवळी़त ही आपले योगदान सेवा देत आकाश यांनी साहि त्य सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर नागपूर हून प्रकाशित होणाऱ्या सा़.शब्दशिल्पचे ते जिल्हा प्रतिनिधी आहेत. शुभंम बाल किशोर युवा व नवोदित राज्यस्तरीय साहि त्य संमेलनाचे अध्यक्ष सु प्रसिध्द वऱ्हाड़ी साहित्यिक श्री. शिवलिंग काटेकर, उदघाटक बालकलाकार धर्मविर -2 फेम चि. अथर्व मोटे,स्वागताध्यक्ष विठ्ठलराव माळी,डॉ.प्रा.संतोष हुशे, अभिनेता डॉ.तुषार बैसणे, कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापुर स़चिलक संदिप पाटील लोड,प्रा.ममता इंगोले, सौ.दिपाली सोसे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करुन सपत्निक सम्माणित करण्यात आले. अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र च्या अंकुर मित्र विदर्भ रत्न, शिक्षक मित्र असे साहित्य क्षेत्रात यशस्वी चळवळी बद्दल त्यांना सहा पुरस्कार प्राप्त आहेत. तर सामाजिक कार्यासाठी 24 च्या वर पुरस्कार मिळाले आहेत.आपल्या साहित्य चळवळ पुरसकाराचे क्षेय अंकुर साहित्य संघांचे संस्थापक स्व. हिम्मतराव शेगोकार, वडील डॉ. एन. टी. डाहेलकर , जिंदादिल शायर जेष्ठ साहित्यिक तुळशीराम जी बोबडे, सुपरिचित कथा कार सुरेश पाचकवडे , यांना व नवी – जुनी केद्रीय कार्य कारी तसेच अंकुर साहित्य संघ, मुर्तिजापुर ला देत हा पुरस्कार अंकुर अनियतका लिका चे कार्यकारी संपादक, अंकुर चा पाया म्हणून ओळख दिली असे डाहेलकर यांचे काकाश्री. स्व. राम दाहेलकर यांच्या चरणी समर्पित करीत आहे.


