रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल महाले यांच्या वर दोन दिवसांपूर्वी भ्याड हल्ला करण्यात आला त्या निषेधार्थ हिवरखेड येथील प्रेस क्लब हिवरखेड व ऑल जनरल लिस्ट अँड फ्रेंड सर्कल पत्रकार संघा च्या वतीने हिवरखेड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. विठ्ठलराव महाले यांच्यावर हल्ला करणाऱ्यां वर पत्रकार संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने पत्रकारांवरील हल्ले होणे ही गंभीर बाब आहे व हा लोक शाही वरच हल्ला असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे या घटनेतील आरोपींना तात्का ळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली. आहे. सदर निवेदन हिवरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार गजानन राठोड यांच्या मार्फ त देण्यात आले. यावेळी प्रेस क्लब संस्थापक अध्यक्ष श्यामशील भोपळे, ए जी फ सी पत्रकार संघाचे अकोला जिल्हा अध्यक्ष किरण सेदानी,प्रेस क्लब अध्यक्ष सतीष इंगळे जिल्हा उपाध्यक्ष,मनीष भुडके , गोवर्धन गावंडे , जितेंद्र लाखोटीया , कैशव कोरडे , रितेश टिलावत , प्रशांत भोपळे , जमीर शेख , बाळासाहेब नेरकर , सुनिल बजाज, प्रदिप पाटील , मनोज भगत , शेहजाद खान , मोहन सोनोणे , सुदाम राउत, संतोष राउत, महेंद्र काराळे,स्थानीक पत्रकार उपस्थित होते.


