भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
माहूर – निर्भीड आणि साडेतोड उत्तर कोणत्याही नेत्याच्या दबावाला बळी न पडता कर्तव्य निष्ठेने पार करून नांदा सौख्यभरे असाच काहीसा संदेश साहेबांच्या कर्तव्यातुन दिसुन येतो.नागरिकांच्या मनात आदर्श निर्माण करणारे दुरदृष्टी ठेवून काम पाहणारे ठाणेदार म्हणजे श्री शिवप्रकाश मुळे साहेब यांचा वाढदिवस सर्वंच स्तरातुन उत्साहात शुभेच्छा व विविध संघटनांनी पुष्पगुच्छ शाॅल श्रीफळ देऊन सन्मान केला आहे.काही पत्रकार बांधवांनी सुध्दा साहेबांचा यथोचित सन्मान केला, सामान्य कार्यकर्ता सामान्य नागरिक असो अतिशय आदर पुर्वक साहेबांचा सन्मान केला आहे तसेच श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनचे व्यापारी बंधु माहुर गड यांनी श्री शिवप्रकाश मुळे साहेब यांना शाॅल श्रीफळ तसेच श्री रेणुका देवीची प्रतिमा देऊन आदर पुर्वक सन्मान केला.असे नागरीकांच्या मनातील कर्तव्य दक्ष साह्यक पोलीस निरीक्षक श्री शिवप्रकाश मुळे साहेब ठाणेदार माहुर यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे माहुर हे तिर्थक्षेत्र आहे ईथे वर्षाभरात दाहा ते अकरा यात्रा भरतात आणि यात्रा काळात विविध जवाबदारी सुरक्षा सुक्ष्म निरीक्षण करून भाविकांना सुलभ दर्शनाची सोय शहरातील सुरक्षा नियोजन गाव खेड्यातील समस्या अशा विविध सुरक्षा निर्भीड पण नागरीकांच्या मनात आदर्श निर्माण करुन न्याय देणारे कर्तव्य दक्ष साह्यक पोलीस निरीक्षक श्री शिवप्रकाश मुळे साहेब माहुर ठाण्याला मिळाल्याने परीसरातील नागरिक आपल्या परीसराला भाग्यवान समजत आहे.


