भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
माहूर – तिर्थ क्षेत्रात नामवंत असलेल्या माहुर शहरात आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर माहुर वासी भीम अनुयायी यांनी प्रबोधनपर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मागील आठ वर्षांच्या आगोदर च्या काळात उत्कृष्ट असे भव्य दिव्य कार्यक्रम होत असत.पण नंतर आप आपसात मी पणाचा डोलारा उभा राहिला होता. बौद्ध संस्कारांचा जनुकाही लाहान थोरांना विसरच पडल्या सारखे वाटत होते.आप आपल्या कामात व्यस्त आप आपल्या राजकीय क्षेत्रात कसे मोठे होता येईल या कडेच ज्येष्ठांचे लक्ष लागून असायचे.तसे पाहता माहुर बुद्ध भुमी परीसरात भव्य दिव्य अशी तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आहे समाज बांधव सुध्दा भरपूर प्रमाणात आहेत.पण स्थानिक भिम अनुयायी विविध प्रस्थापित पक्षांच्या पक्षात असल्याने बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्याचे विसरूनच गेले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध परीषेदत भाषेणे दिली. युवक परीषेद, विध्यार्थी परीषेद,१२ फेब्रुवारी १९३८ ला मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन,११ सप्टेंबर १९३८ अस्पृश्य विद्यार्थी संमेलन ११ वे पुणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा अशा विविध परीषेदेला व संमेलानला महत्त्व दिले मग आपण बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन का करु नये केवळ आरक्षित जागेवर निवडणूक लढवायची निवडुण यायचे आणि मग प्रख्यात कवी वामनदादा कर्डक यांच्या गीता प्रमाणे.तुझ्या हाती तुप दिले.तुझ्या हाती साय.समाजाच कायरे गड्या.समाजाच काय.अशीच काहीशी परिस्थिती सध्या माहुर तालुक्यात पाहायला मिळत आहे.वाढदिवस किंवा लग्न वाढदिवस समारंभात हार तुरे आणि स्वागताचा गाजा वाजा यात समाजाचा रथ चालतो? डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझी चार भाषणे तर शाहीराचा एक जलसा समाजाला जागृत करेल आणि म्हणून भिम शाहीरी जलसा पोटतिडकीने डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगणारा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक कव्वाल भिमेश भारती नागपूर, आणि यांच्या सामन्याला उत्तर प्रदेश च्या सुप्रसिद्ध गायीका कव्वाला करीश्मा ताज यांचा धुमधडाक्यात बाहारदार वैचारिक सामाना दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी बुध्द भुमी परीसरात होणार असून आयोजकाने या कार्यक्रमासोबत सत्कार माहुर तालुक्यातील चमकणारे हीरे जे की आपल्या जिद्द कौशल्यातुन आभ्यासु शैक्षणिक गुणवत्तेवर अधिकारी झाले आहे.यांना एका मंचावर आनुण हजारो भिम अनुयायां समोर सत्कार होणार आहे.तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांचा सुध्दा आयोजकांकडून सत्कार करण्यात येणार आहे विदर्भातील आंबोडा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा आंबेडकरी जेष्ठ कार्यकर्ते आयु.यशवंत वंजारे तसेच मराठवाड्यातील सारखणी येथील आंबेडकरी कार्यकर्ते रुबाबदार आणि जबाबदार पण मन मिळावु मिलिंद तुळशीराम कांबळे यांचा सुध्दा सत्कार करण्यात येणार आहे.सेवा गौरव पुरस्कार मा.करुणा व मा.आरुण आळणे संचालक संथागार वृध्दाश्रम किनवट यांचा ही यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.विषेश आकर्षण रोहित पीसाळ बुध्दीष्ट गोल्ड मॅन मुंबई हे राहणार असून.मंच्यावर उपस्थित उदघाटक म्हणून एकेकाळी सामान्य कार्यकर्ता म्हणून समाजात अपरीचीत होते पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी भारीप बहुजन महासंघाचे भिमराव केराम यांना तिकीट देऊन विजय खेचून आनुण आमदार बनविले होते.नंतर पक्षांतर केल्यावर काही काळ पराभूत झाल्यानंतरही हार न मानता पुन्हा भा.ज.पा.च्या तिकीटावर प्रचंड प्रमाणात मताधिक्य मिळवून मागील २०१९ पासून विध्येमान आमदार किनवट माहुर तालुक्यातील लाढके आमदार म्हणून मा. भिमराव केराम साहेब हे या कार्यक्रमाचे उध्दघाटक असुन.याच्यां समवेत हिंगोली लोकसभेचे खासदार मा.नागेश पाटील आष्टिकर तसेच आर्णी आणि केळापूर मतदार संघाचे आमदार राजु तोडसाम,कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पंचशील विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश गायकवाड पडसा, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहुर नगरीचे नगराध्यक्ष मा.फिरोज दोसानी, सत्कार मुर्ती मा.प्रा. डॉ मोहनराव मोरे नगराध्यक्ष पुर्णा,मा.प्रशांत राठोड मंत्रालय मुंबई,मा.बेबीताई प्रदीप नाईक नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार गट) , प्रमुख वक्ते भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके,विशेष अतिथी मध्ये राजेंद्र केशवे संचालक कापूस पणन माहासंग म.रा.राज्य मुंबई,मा.खाजा बेग आमदार विधान परिषद आर्णी,मा.ज्योतिबा खराटे जिल्हा अध्यक्ष शिवसेना (उ.बा.ठा.गट), समाधान जाधव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नांदेड, महेंद्र मानकर अध्यक्ष नि रामदास आठवले सुतगीरणी दिग्रस, देवेंद्र मुनेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी महागाव, राजेंद्र लोणे उपप्राचार्य रे.दे.काॅलेज माहुर, आनंद वाठोरे साह्यक पोलीस निरीक्षक यवतमाळ, युवा उद्योजक असुन कसालाही गर्व न करता संयमी शिलवान असे श्री तथागत बापुराव कावळे महागाव, बंडु पाटील भुसारे जिल्हा परिषद सदस्य कुपटी,नाना लाड उपनगराध्यक्ष माहुर,जावेद पहेलवान नगराध्यक्ष दिग्रस, गोविंदराव मगरे पाटील चेअरमन सेवा सहकारी सोसायटी लांजी, दत्तराव मोहीते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती माहुर,एस एस पाटील ता. अध्यक्ष महा.रा.शि.प.माहुर, मारोती रेकुलवार सरपंच तथा माजी सभापती,सागर माहामुने नगरसेवक माहुर,मा.निरज वाघमारे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ, मनोज किर्तने संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माहुर, भाग्यवान भवरे अध्यक्ष राजश्री शाहू फाऊंडेशन,आशिष शेळके किनवट, ऍड विशाल भवरे माहुर, विकास कुडमते युवा आदिवासी नेते किनवट, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे आयोजन नवतरुण आयोजक आकाश रमेश कांबळे माहुर यांनी केले असून समाज बांधवांशी जवळुन हीतगुज व्हावी यासाठी आयोजक आकाश कांबळे यांनी तमांम बौद्ध बांधवांना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.


