प्रशांत मुनेश्वर शहर प्रतिनिधी नांदेड
महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचा 23 मार्च 2025 रोजी, नांदेड जिल्हा दौऱ्याचा आयोजन करण्यात आलं होतं. या दौऱ्यात अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश देण्यात आला त्या मध्ये माजी खासदार भास्कर पाटील खात गावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा. जिल्हा परिषद च्या माजी सदस्य मीनल ताई खतगावकर, भास्कर भिलवंडे यांच्यासह अनेकांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर अजितदादांनी मुस्लिम बांधवांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, मला ही या कार्यकमाला दैनिक अधिकारनामा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहता आलं.येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नांदेड जिल्ह्यात स्वतःची ओळख निर्माण करेल असा विश्वास प्रवेशित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


