सदानंद पुरी माहुर प्रतिनिधी माहूर
तालुक्यात सायफळ कोळी शिवारातील स्टोन क्रेशर येथे माळातील गोट्याचे ब्लास्टिंगद्वारे परवान्यापेक्षाही किती पट जास्त गैण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे. अवैध व बेकायदेशीर उत्खनन करून शासनाचा कोटीयोवती रुपयांचा महसूल बुडवण्याचा सपाटा लावला आहे. प्रशासन मात्र गांधाराची भूमिका घेऊन गप्प बसलेले आहे. यामुळे कुंपणच शेत खातय की काय, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे सायकल कोळी शिवारातील स्टोन क्रेशर दगड खान पट्ट्या मधून हजारो ब्रास गैण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू. क्रशर धारकांनी पूर्ण क्षमतेने क्रेशर चालून आतापर्यंत हजारो ब्रास गैण खनिजाचे उत्पन्न केले आहे. हे उत्खनन शासनाने दिलेल्या परवान्यापेक्षा दुप्पट तिप्पट जास्त अवैध मार्गाने दगडाचा ब्लास्टिंग द्वारे उत्खनन केले आहे ई टी एस मोजणीचा फार्सगैणखणीजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने मजूर ब्रास पेक्षा जास्त उत्खनन होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्यात यावी गैण खनिजाच्या उत्खनन स्थळांची वेळोवेळी पाणी करून उत्खननाची एटीएस द्वारे मोजणी करण्यात यावी जिल्हा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना असे आदेश दिले जातात यासाठी तालुकास्तरावर दक्षता टक्के स्थापन करावेच अशीही आदेश आहे. परंतु आदेशांना तालुका महसूल विभागाने केराचे टोपली दाखवली आहे. याबाबतीत एखाद्याने आवाज उठवला किंवा तक्रार केल्यास लोकांच्या डोळ्यात करण्यासाठी फक्त ई टी एस मोजणीचा फार्स केला जातो


