मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली/ यावर्षी मिरची आणि कापसाचे बाजारभाव आधीच कमीअसल्याने शेतकऱ्यांनी आपले पीक विकण्यास उशीर केला.अनेक शेतकरी योग्य भावाच्या प्रतीक्षेत होते.मात्र नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने हे पीक जमिनीतच नष्ट झाले.त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे – एकीकडे भाव कमी,तर दुसरीकडे पीक.हातातून गेल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.भाव कमी नुकसान अधिकयावर्षी मिरची आणि कापसाचे बाजारभाव आधीच कमीअसल्याने शेतकऱ्यांनी आपले पीक विकण्यास उशीर केला. अनेक शेतकरी योग्य भावाच्या प्रतीक्षेत होते. मात्र नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने हे पीक जमिनीतच नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे – एकीकडे भाव कमी, तर दुसरीकडे पीक हातातून गेल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.अर्थिक संकटात शेतकरीमिरची आणि कापसाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनीमोठा खर्च केला होता. मात्र, पावसामुळे पीक वाया गेल्याने त्यांचे सर्व नियोजन कोलमडले आहे. यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.सरकारकडून मदतीची अपेक्षाया आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक द्यावी मदतीची मागणी केली आहे. पीक विमा योजना आणि तातडीच्या भरपाईद्वारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.स्थानिक शेतकऱ्यांची प्रतिक्रियाभाव कमी असल्यामुळे आम्ही पीक विकले नाही.आता पावसामुळे सगळे नुकसान झाले. सरकारने त्वरित मदत करावी, नाहीतर आम्हाला कर्जबाजारी होण्याची भीती आहे,असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


