सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
मौजे हुनगुंदा येथील रहिवासी असलेले अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन लग्नाचे दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आरोपी समीर उस्मान शेख वय २४ वर्ष रा. हुनगुंदा ता.बिलोली व अल्पवयीन मुलीस पळून नेण्यास मदत करणारा आरोपी २) सुर्यकांत शंकरराव धर्मापुरे वय २१ वर्ष रा.हुनगुंदा ता.बिलोली यास अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा बिलोली येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरापासून अंतरावर असलेल्या मौजे हुनगुंदा येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत सविस्तर माहिती असे की,पोलीस स्टेशन कुंडलवाडी गुन्हा रजि. नंबर ४९/२०२५ कलम १३७(२) भारतीय न्याय संहीता अन्वये दाखल गुन्हयामध्ये कलम ३(१)(डब्ल्यु),३(२)(५) (अ) अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व सहकलम ६४,३ (५) भारतीय न्याय संहीता व कलम ४,६,८,१२ लैंगिक गुन्हयापासुन मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) कायदा अन्वये कलम वाढ करुन आरोपीतांना अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता.आरोपी समीर उस्मान शेख वय २४ वर्ष रा. हुनगुंदा ता.बिलोली व अल्पवयीन मुलीस पळून नेण्यास मदत करणारा आरोपी २) सुर्यकांत शंकरराव धर्मापुरे वय २१ वर्ष रा.हुनगुंदा ता.बिलोली यास दिनांक २२ मार्च रोजी बिलोली येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा आरोपींना दोन दिवसांची म्हणजेच दि. २४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी बिलोली येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.


