रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव : १९ मार्च १९ ८६ रोजी महागांव तालुक्यातील चिलगव्हान येथील शेतकरी साहेबराव शेषराव करपे पाटील यांनी पत्नी मालती मुलगा भगवान ,मुलगी सारिका,मंगला आणि विश्रांती यांना सोबत घेऊन सामुहिक आत्महत्या केली होती.या शेतकरी कुटुंबीयातील आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता.राज्यात गाजलेली ही पहिली सामुहिक आत्महत्या.साहेबराव पाटील करपे आणि कुटुंबियांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांना जन्म गांव चिलगव्हान आणि संपूर्ण महाराष्ट्रात अन्नत्याग आंदोलन करण्यात आला असून या अन्नत्याग आंदोलनाच्या पुर्वसंध्येला महागांव तालुक्यात मागील वर्षी आत्महत्या केलेल्या ६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अनुदान म्हणून सहा लाखाची मदत महागांव तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.शेतकऱ्याप्रती काळजात संवेदनेचा ठोका कर्तव्यदक्ष असलेले तहसीलदार श्री अभय मस्के साहेब यांनी तातडीने सर्व प्रक्रिया पार पाडत हा मदत निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देण्यासाठी पुढाकार घेतला.महागांव तालुक्यात सनं.२०२४ या वर्षी झालेल्या शेतकरी आत्महत्यापैकी सहा प्रकरणे अनुदानास पात्र ठरली.निलेश आदीनाथ जगंले पिंपळगाव,कीशोर मोतीराम जाधव बेलदरी, निलेश विजय जाधव दगथर, सुधाकर नारायण विलायते सवना, भगवान दतात्रय चव्हाण लेवा, आणि विनोद हिरासिंग जाधव नाईक नगर,या शेतकऱ्यांनी नापीकी, आणि कर्जबाजारीला कंटाळून वैफल्यग्रस्त अवस्थेत मरण कवटाळले होते.घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आभाळा एवढ्या वेदना ,व डोंगराऐवढे दुःख सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना महागांव तहसील प्रशासनाच्या वतीने मदतीचे धनादेश देण्यात आले.तहसीलदार अभय मस्के यांनी सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून अन्नत्याग आंदोलनाच्या पुर्वसंध्येला ही मदत शेतकरी कुटुंबियांना दिली.तहसिलदार श्री अभय मस्के साहेब यांच्या या कार्य तत्परतेचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.


