मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्राव्दारे जिल्हा क्रीडा कॉम्प्लेक्स गडचिरोली इथे दि.17 मार्च सोमवार रोजी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाले. यावेळी विविध स्पर्धेत सहभागी विजेत्या खेळाडुंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले.मागील महिन्यात जिल्ह्यातील बारा ही तालुक्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आले. त्यामध्ये 15 ते 29 वयोगटातील मुलांमुलींची 100 मी.धावने, गोळफेक व मुलांची कबड्डी व मुलींची खो -खो हे वैयक्तिक व सांघिक खेळ घेण्यात आले होते.प्रत्येक तालुक्यातील विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी.प्रमाणपत्र व क्रीडा साहित्य देऊन त्यांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली . तालुकास्तरीय स्पर्धेनंतर जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आले. यामध्ये 100 मी धावणे स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक दिशांत बोमकंटीवार.द्वितीय रुपेश बुरमवार तृतीय क्रमांक हितेश कावळे तर मुलींमध्ये प्रथम ट्विंकल कुकडे द्वितीय श्रेया मरस्कोल्हे.तृतीय क्रमांक सोनाली तोफा हिने पटकविला. गोळाफेक या खेळात मुलांमध्ये प्रथम क्रमांक सचिन चिताडे व्दितीय-रोहित गुरुनुले.तृतीय क्रमांक सुमित गावळे यांनी तर मुलींमध्ये प्रथम केतकी भोयर व्दितीय विद्या राणा.तृतीय क्रमांक-मेरी गावडे हिने पटकविला.तर सांघिक खेळ खो-खो मध्ये प्रथम गडचिरोली संघ.व्दितीय क्रमांक धानोरा खो-खो संघ यांनी पटकविला. कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम गडचिरोली संघ.व्दितीय क्रमांक धानोरा कबड्डी संघ यांनी पटकविला.सर्व विजयी स्पर्धकांना ट्राफी.मेडल्स, प्रमाणपत्र व टी-शर्ट देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे जिल्हाधिकारी क्रीडा अधिकारी गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे.कुस्ती प्रशिक्षक श्री.सुप्रसिद्ध बडकेलवार व्हालिबॉल प्रशिक्षक श्री.नाजूक उईके हे प्रामुख्याने उपस्थित होते.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता प्रविण बारसागडे.आशिष बिश्वास आदींनी परिश्रम घेतले.


