गणेश वाघ ग्रामीण प्रतिनिधी कसारा
नवीन कसारा घाटात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंटजवळ सिमेंटने भरलेला ट्रक मुंबईकडे जात असतांना २०० फूट खोल दरीत कोसळला. ही अपघाताची घटना पहाटेच्या सुमारास घडली. ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक दरीत कोसळून अपघात झाला. याअपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. अपघातात ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून दरीत पूर्णपणे सिमेंट पसरलेआहे. महामार्ग पोलीस केंद्र घोटी व रूट पेट्रोलिंग टीम व कसारा शहापुर येथील आपत्ती टीमचे सदस्य देवा वाघ, गणेश विनर घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरु करून त्यांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर कडूनतपासणीसाठी मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.सौद अहमद अन्सारी (वय २८ रा. मालेगाव) व त्याचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब हे जागीच ठार झाले आहेत.


