सोनल पाटिल तालुका प्रतिनिधी भद्रावती
शेगांव खुर्द : ग्राम पंचायत शेगाव खुर्द आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी( मेघे ) तसेच जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 मार्च 2025 रोजी सर्व रोग निदान व उपचार शिबिर सुसंपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन मोहित लभाने सरपंच शेगाव खुर्द, उषा विनोद जीवतोडे उपसरपंच शेगाव खुर्द, संतोष भाऊ पिंगळे, तालुका समन्वयक भद्रावती, विराज धाडसे यांच्या देखरेखी मध्ये तसेच पुढाकाराने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराला विशेष उपस्थिती श्री संजय इंगळे विशेष कार्य अधिकारी (दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी मेघे ), डॉ. चंद्रशेखर महाकाळकर ( मुख्य वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा ), डॉ अभय मुडे ( संचालक सार्वजनिक स्वास्थ्य आणि विस्तार विभाग दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन विभाग सावंगी मेघे ) होती. या शिबिराला 360 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 127 ज्येष्ठ नागरिक आणि बाकी इतर 233 रुग्णांची तपासणी करण्यात आली. पुढील उपचारासाठी 69 रुग्णांना सावंगी मेघे रुग्णालयाला भेट देण्यास सांगितण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे कर्मचारी मनोज सोदारी यांचे विशेष सहकार्य लाभले. अशा प्रकारचे शिबिर ठीक ठिकाणी घेण्यात येईल त्याचा फायदा सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावा हाच संस्थेचा उद्देश असे संस्थेच्या अध्यक्षांनी सुचवले.


