रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव:मार्च महिन्या चा दुसरा आवड्यातच वाढत्या तापमाणाने नागरिक त्रास्त झाले आहेत. उन्हाळ्याची सुरुवात मार्च महिन्यापासून होते तर एप्रिल, मे ,या महिन्यात उष्णतेची लाट असते परंतु मार्च महिन्यातच उष्णतेची लाट निर्माण झाली आहे . वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणाचा समतोल बिघडलाय एप्रिल, मे राहणारी उष्णतेची लाट मार्च महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे . नागरिकांनी दुपारी घराबाहेर निघणे बंद केले आहे . शहरामध्ये बाजारपेठेत दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसतो आहे . वातावरणातील बदलामुळे काही दिवस उष्णतेचा प्रकोप राहणारा असल्याचे हवामान तज्ञाकडून सांगण्यात येत आहे . नागरिकांनी उष्णते पासून वाचण्यासाठी शीतपेय , बाहेर जाताना अंगावर सेल कॉटन कपडे , कामाच्या ठिकाणी थंड पाणी जास्तीत जास्त सेवन करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे . यावर्षी अवकाळी पाऊस न आल्यामुळे अतिशय प्रमाणात उष्णता जाणवत आहे नदी नाले विहिरी बोर कोरड्या पडल्या आहेत . त्यामुळे परिसरामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे .————— बॉक्स———–आरोग्य विभागाचे नागरिकांना तर्फे अहवाहन.तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री / टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.प्रवासात पाणी सोबत ठेवा.मद्यपान, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स आणि फ्रिजचे पाणी टाळा.ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा ‘हायड्रेट’ करण्यास मदत होते.जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.डॉ. निमिष धुळधुळे तालुका आरोग्य अधिकारी महागांव


