जय वारकरी ग्रामीण प्रतिनिधी पांढरकवाडा.
करंजी रोड येथून 3किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र 44वर सोनुर्ली फाटा येथे ट्रक व दुचाकीची धडक होऊन 1ठार तर दुसरा इसम गंभीर रित्या जखमी झाला आहे. सदरची घटना अशी कि काल दि.21-3-025शुक्रवार रोजी नामे अविनाश बालू कनाके वय वर्ष 28व प्रकाश मलांडे 30हे दोघे रा. सोनोर्ली काही वयक्तिक कामानिमित्याने करंजी रोड येथे आले असतांना आपले काम आटपावून ते सोनुर्ली च्या दिशेने निघाले तेवढ्यात भरधावं वेगाने हेंद्राबाद च्या दिशेने येणाऱ्या. कंटेनर ट्रक क्रमांक के एफ -2250 या ट्रक ने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जबरदस्त धडक दिल्ली या धडकेत.अविनाश कनाके हा जागीच ठार झाला तर त्यांच्या सोबत असलेला सहकारी प्रकाश मलांडे हा गंभीर रित्या जखमी झाला तरी या घटनेची माहिती मिळताच करंजी येथील महामार्ग मदत केंद्राचे पोलीस घटनास्थळी पोहचून जखमीना करंजी येथील ग्रामीण रुग्णायलयात भरती करण्यात आले या नंतर ट्रक चालक हा स्वतःहून पांढरकवाडा पोलीसस्टेशनंला स्वाधीन केले तरी हा अपघात वडकी पोलीस स्टेशनं च्या हद्दीत येत असल्याने वडकी पोलिसांनी गुंन्हा दाखल करून ड्रायवर ला अटक केली आहे


