रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
वाकान/प्रतिनिधी
महागांव तालुक्यातील इजनी ते हिवरा (सं) रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन मंजूर करण्यात आले आहे.मात्र हे काम अतिशय संत गतीने सुरू असल्याने अध्यापही दुसऱ्या कोटचे खडीकरणाचे काम रखडलेले आहे.जागोजागी गीटी उघडी पडली आहे व संपुर्ण रस्त्यावर केवळ गिटीचेच साम्राज्य आहे.सदर रस्त्याचे काम करीत असलेले गजानन कंट्रकशन कंपनीचे कंत्राटदार अतीशय हलगर्जीपणाने काम करीत असल्याने या तीन ते चार की.मीटरच्या रस्त्याची अतीशय दैनिय अवस्था झाली आहे या रस्त्यावर रोजचाच अपघात ठरलेला आहे.त्यामुळे येथील अनेक प्रवाशांना संकटांचा सामना करावा लागत आहे.या रस्त्यावर अनेक वेळा अॅटो पलटी झाल्याने प्रवाशी गंभीर जख्मी झाले आहेत.दुचाकी चालक पडल्याने अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.मात्र संबंधित कंट्रकशन कंपनी यांचेवर कोणत्याही प्रकारचे परीणाम झाले नाही.सदर रस्त्याचे काम एक वर्षापासून सुरू असुन अध्यापही पुर्णत्वास गेलेले नाही.अतीशय कासव गतीने सुरू असलेले रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवार दिनांक २१/ मार्च रोजी इजनी येथील शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामवाशीयाकडुन हिवरा येथील नॅशनल हायवे ३६१ वर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.यामुळे दोन्ही साइटच्या वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.गजानन कंट्रकशन कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांने निवेदन कर्ते महागांव शिवसेना उपतालुका प्रमुख तुकाराम उमरे, बिपीन पवार,व इतर नागरिकांशी संवाद साधुन तात्काळ दोन दिवसात रस्त्याचे काम सुरू करन्याचे लेखी आश्वासन दिले.व त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी महागांव पोलिस स्टेशनचे ए.पी.आय.मीलींद सरकटे,पी.एस.आय.राठोड साहेब, हिवरा बिट जमादार दिनेश आडे, संतोष जाधव, कैलास मुकाडे,दिनेश जमदाडे, कैलास नेवरकर, गजानन ढगे, महामार्ग पोलिस केंद्र कोसदनी, येथील पी.एस.आय.पवार सर , पोलिस कर्मचारी जय जाधव, संतोष हराळ,माधव आत्राम यांनी रास्ता रोको आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.


