संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ र. न. २३५ तर्फे जिल्हाध्यक्ष मा.राजुदास जाधव यांनी केलेल्या आव्हानाला साद देत घाटंजी तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने १५ मार्च २०२४ संचमान्यतेचा शासन निर्णय पूर्णतः रद्द करण्याबाबतचे निवेदन तालुका दंडाधिकारी यांच्या मार्फत शासनाला सादर करण्यात आले. नवीन संचमान्यतेच्या निर्णयामुळे लाखो शिक्षक, डीएड, बीएड पदवीधारक, बेरोजगार होणार असल्यामुळे या अन्यायकारक शासन निर्णया विरोधात य.जी. प. प्राथ.शिक्षक संघ र.न.२३५ ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराला हरताळ फासनारा हा निर्णय असल्यामुळे निवेदनाच्या माध्यमातून विरोध दर्शविण्यात आला आहे. १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
यावेळी, डी.डी. पुसानाके, अविनाश खारतडे, राजू उपरिकर, दिवाकर हेमके, यशवंत घुगरे, बंडोपंत धांदे,भाऊ कुलमुलकर,
बिबिषण झाडे, राजू राठोड,हिरालाल राठोड,रवि आडे आदी शिक्षक उपस्थित होते.


