मारोती बारसागडे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली :-
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद केंद्र शाळा कुनघाडा रै येथील मुख्याध्यापिका गीता शेंडे यांचे स्थानांतरण झाल्यामुळे त्यानिमित्त स्थानिक केंद्र शाळेत निरोप समारंभ व अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अविनाश चलाख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणू शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष किरण कुकडे पुरुषोत्तम सातपुते.उपाध्यक्षा आशा भांडेकर.ग्रा प सदस्य विनोद दुधबळे.रविंद्र कुनघाडकर.ग्रा प सदस्य दिलीप दुधे.मंगेश वासेकर, जयश्री टिकले.जयश्री भोयर.नमिता भांडेकर.ज्योती कोसमशिले.रिंगनाथ चापडे भुजंग कोडाप, शालिनी रामटेके, दर्शना क्षीरसागर.जि.प. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा गौरकार.निमाई मंडल.लीलाधर वासेकर.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक गुरुदास सोनटक्के खोब्रागडे.वन्नेवार.विजय दुधबावरे.अंजली तंगडपल्लीवार अनिल दुर्गे.आदी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यध्यापक गुरुदास सोनटक्के यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून भावनिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच अविनाश चलाख यांनी मुख्याध्यापिका गीता शेंडे यांच्या कार्याचे कर्तृत्वाचे व शालेय विकासात दिलेल्या योगदानाचे कौतुक करून आठवणीचा उजाळा दिला. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापिका गीता शेंडे यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका शेंडे यांच्याकडून शाळेला तसेच ग्रामपंचायतला महापुरुषांचे फोटो भेट दिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार विजय दुधबावरे यांनी केले.


