दिपक केसराळीकर
तालुका प्रतिनिधी बिलोली
बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. याकरिता तेथील भिक्खू संघ गेल्या 20 दिवसापासून उपोषणास बसले आहेत.परंतु अद्याप पर्यंत केंद्र शासनाने व बिहार शासनाने याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. म्हणून सबंध भारतीय बौद्ध बांधवांच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता नांदेड जिह्वा भारतीय बौद्ध महासभा शाखा बिलोली तालुक्याच्या वतीने बिलोली चे नायब तहसीलदार पदमवार यांना दिनांक 7 मार्च वार शुक्रवार रोजी भारतीय बौद्ध महासभा शाखा बिलोलीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. बुद्धगया येथील महाबोधी विहाराचं ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न चालू असून, तमाम भारतीय बौद्धांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्या अनुषंगाने महाबोधी विहार व्यवस्थापन 1949 च्या कायद्यामध्ये तात्काळ बद्दल करून महाबोधिविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भारतीय बौद्ध महासभा बिलोली तालुकाध्यक्ष आयु. बालाजी वारघडे,तालुका सरचिटणीस आयु. नागोराव वाघमारे, कार्यालयीन सचिव आयु. अनिल सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


