रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागांव : तालुक्यातील सेवादास नगर,वडद येथील शंकर नंदु पवार वय वर्षे (४६) यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतात जाऊन विषाचा घोट घेतला.त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.हि घटना १० मार्चला सकाळी तालुक्यातील सेवादास नगर येथे घडली.शंकर नंदु पवार रा.सेवदास नगर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नांव आहे.सविस्तर वृत असे की तो वडिलोपार्जित शेती करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा गेल्या काही वर्षांपासून निसर्ग साथ देत नसल्याने त्याला सतत नापीकी झाली.त्यातुन त्यांच्या शिरावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता.व शासकीय जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व काही खाजगी कर्ज त्यांच्यावर असल्याने काही दिवसांपासून तो चिंतेत विमनस्क राहायचा अखेर त्याने १० मार्च रोजी सकाळी टोकाचे पाऊल उचलत आपले शेत गाठले.तसेच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.अंगात विष शिरताच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली.ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी पुसद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर व चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळ येथे हलविण्यांचा सल्ला देन्यात आला.मात्र १९ मार्च रोजी सकाळी उपचाराला प्रतिसाद न देता त्यांनी अखेरचा श्वास घेतला व त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व तीन मुली असा आत्प परिवार आहे.या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.


