आनंद कुरुडवाडे
सर्कल प्रतिनिधी रामतीर्थ
बिलोली तालुक्यातील खतगाव येथील कौल करणाऱ्या शेतकऱ्याचे एक हेक्टर मधील तंबाखू उत्पादन केलेल्या भट्टीला १७ मार्च रोजी सकाळी आग लागून जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रामतीर्थ परिसरासह खतगाव, मिनकी, मुतन्याळ, केसराळी आदी परिसरात शेतकऱ्यांनी बऱ्याच प्रमाणात तंबाखूचे उत्पादन घेत आहेत. सदर तंबाखूच्या पानाची कापणी करून त्या पानास पिकविण्यासाठी शेतामध्येच तंबाखूची भट्टी तयार करून त्यात केर कचरा टाकत रात्रंदिवस धूप देण्याच्या शेतकरी कामास लागले आहेत. त्याच अनुषंगाने खतगाव येथील पंढरी नागोराव जाधव व प्रकाश नागोराव पेटेकर यांनी एकाच शेतमालकाची एक हेक्टर जमिनीतून प्रत्येकी ०.५० आर एवढी जमीन कौल करून त्यात तंबाखूचे उत्पादन घेतले. घेतलेल्या तंबाखू उत्पादनाचे पानाची काढणी करून एकाच ठिकाणी भट्टी तयार करून
त्यासधुपदेत होते. १७ रोजी सकाळी अधिकचा धूप देण्याच्या उद्देशाने सदर शेतकऱ्यांनी जास्तीचे केर कचरा टाकल्याने धुपचे रूपांतर आगीत होत संपूर्ण तंबाखूची भट्टीच जळून खाक होत जवळपास कौल केलेल्या दोन्ही शेतकऱ्याचे अडीच अडीच लाख असे मिळून जवळपास पाच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेचा आदमपूर सज्जाचे मंडळ अधिकारी लक्ष्मण पंगे यांनी शेतकरी व गावकऱ्यांच्या समक्ष अगीत नुकसान झाल्याचे पंचनामा करीत बिलोली तहसील कार्यालयात अहवाल दाखल केले आहे.


