पंकज जयस्वाल
ग्रामीण प्रतिनिधी माहुर
सिंदखेड – मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला दोन मार्चपासून सुरुवात झाली असून मुस्लिम बांधवांच्या या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधवाकडून अल्लाह साठी रोजा ठेवून पाच वेळा नमाजाचे पठाण करणे व दिवसभर पाणी न अन्नाचा एक कण सुद्धा न खाता रोजा धरावा लागतो अशाच एक माहूर तालुक्यातील सिंदखेड येथील आठ वर्षीय आमीन जावेद शेख यांनी आपल्या आयुष्यातील पहिले चार रोजे पूर्ण केले त्यांच्या या रोजा मुळे त्यांचे वडील जावेद बाशा शेख व त्यांची आई फातिमा जावेद शेख, यांनी आमीन चे कौतुक केले व सिंदखेड गावातील नागरिकांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले.


