कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
एकता वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटी उद्घाटन तथा इफ्तार पार्टी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न पुसद – कोणत्याही समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय उपाय नाही, मुस्लिम समाजाच्या विकासाकरिता मी आणि माझा परिवार नेहमी तयार आहोत, अल्पसंख्यांक मुस्लिम समाज मुख्य धारेमध्ये येणे गरजेचे आहे याकरिता समाजातील जबाबदार व्यक्तींनी समोर येऊन हे कार्य हाती घेतले त्याबद्दल मला एकता वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटी चा अभिमान आहे तसेच माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे कोणतीही मदत लागली तर आम्ही नेहमी तत्पर आहोत अशी मी ग्वाही देतो” अशा प्रकारे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रतिपादन केले.
एकता वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटीचा उद्देश मुस्लिम समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे, सामूहिक विवाह मेळाव्यांचे आयोजन, स्पर्धे परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि स्टडी सर्कलची स्थापना करून देणे, पुसद तालुक्यासाठी ॲम्बुलन्स सेवा तसेच धर्मार्थ दवाखाने आणि डिस्पेन्सरीज सुरू करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांतर्गत सदर सोसायटी पुसद तालुक्यात कार्य करून समाजाची सेवा करण्यात सदैव तत्पर राहील.
या प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याकरिता सदर सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. आज सिल्वर पार्क येथील रॉयल फंक्शन हॉल येथे या सोसायटीचे उद्घाटनीय कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगोली चे किसान नेते वसीम देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून मुफ्ती शाकीर रज़ा बरकाती, इमाम रहमानिया मस्जिद पुसद, हाफीज डॉक्टर मुबीन सिराजी तसेच जमाते इस्लामी जिल्हा अध्यक्ष शेख नईम आणि मंचावर संस्थेचे अध्यक्ष शेख इरफान उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात हाफीज मोबीन सिराजी यांच्या कुराण पठणाने झाली त्यानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते रिबन कापून औपचारिक रित्या एकता वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनीय समारंभात संस्थेचे अध्यक्ष शेख इरफान, उपाध्यक्ष अति को दिन खतीब, सचिव शेख कय्युम, सहसचिव ईश्तियाक भाई, कोषाध्यक्ष अबरार खान तसेच सदस्यगण शेख मुश्ताक भाई अब्दुल मजीद भाई, अब्दुल जावेद, अमजद खान पठाण, शेख आरिफ आणि समीर खान यांनी उपस्थित अध्यक्ष प्रमुख अतिथी यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सामूहिक इफ्तार चे आयोजन करण्यात आले व सोबतच जेवणाची व्यवस्था पण करण्यात आली. या कार्यक्रमात पुसद शहरातील प्रमुख व्यक्ति जाकी अनवर जैनुल भाई कौसर खान एडवोकेट अजहर खान इकबाल खान मोबीन सर आज़मी अहमद मुश्ताक अली सर रफीक ठेकेदार रहमान गौरी नावेद सर युनूस ठेकेदार डॉ अकिल हन्नान सर नन्हें खान जलील बागवान अमजद खान युनूस माजी नगर सेवक तसेच तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गुलाम अहमद सर यांनी केले


