आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
पाली – सुधागड मराठा समाज या संस्थेचे चा वतीने इयत्ता 10 वी 12 ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर चा वेगवेगळ्या वाटा समजुन घेण्यासाठी रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी दुपारी ठीक 1.30. वाजता सुधागड तालुका मराठा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. धनंजय साजेकर साहेब यांचा अध्यक्षतेखाली विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबिरास महाराष्ट्रराज्य प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र, करिअर मेकर्स अकॅडमि मुंबई, तथा झी 24 तास, साम मराठी, दूरदर्शन (सह्याद्री ) या वृत्त वाहिन्यांनावर करिअर चे करिअर विषयक मार्गदर्शन करणारे मा. प्राध्यापक श्री. संजय मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या शिबिरास आपल्या तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शाळा, विद्यालय, महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यानी स्व. स. स. साजेकर सभागृह मराठा समाज भवन, पाली – शिळोशी रोड पाली ता.सुधागड जि. रायगड येथे उपस्थित राहण्याचे आव्हाहन मराठा समाज संस्थेचा वतीने आणि संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बळीराम वी. निंबाळकर,सरचिटणीस श्री. सुजित स. बारसकर, खजिनदार श्री. योगेश ह. मोरे,शिक्षण समिती प्रमुख प्रा. संतोष रा. भाईर,अध्यक्ष मान. धनंजय साजेकर साहेब यांचा वतीने सदर शिबिरास उपस्थित राहून विनामूल्य शिबिराचा फायदा घेण्यात यावा असे सूचित करण्यात येत आहे. तसेच हे विनामूल्य शिबीर सर्व जाती धर्मातील विध्यार्थी – पालक वर्गासाठी आहे. जास्तीत जास्त सुधागड मधील विध्यार्थ्यानी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या पाल्यांचे भविष्य घडविण्याचा सल्ला श्री. धनंजय साजेकर साहेब यांनी दिला आहे.


