गजानन डाबेराव
तालुका प्रतिनिधी नांदुरा/ मलकापूर
नांदुरा :- सध्या पवित्र रमजान महिना सन होळी रंगपंचमि शिवजयंती असे महत्वाचे सन उत्सवं साजरे होतं आहेत काल परवा नागपूर येथे जातीय दंगल गुन्हा घडला असे आपल्या शहरात गम्भीर गुन्हे घडू नये याकरिता नांदुरा पोलिसांनी शहरातील प्रत्येक वॉर्डध्ये मोहोलला कमिटीच्या मिटिंग घेवून समिश्र वस्तीत गर्दीच्या ठिकाणी कॉर्नर मिटिंग घेवून नागरिकांना शांततेचे आवाहन केले त्यामध्ये, सोशल मीडिया चा वापर योग्य रीतीने करावे, फेसबुक वॉट्सअप, ट्विटर ईस्टग्राम, यावर इतर धर्मीय बांधव यांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट व्हिडीओ रिलस, स्टेट्स बनवू नये त्या प्रसारित करू नये, पवित्र धार्मिक स्थळ मंदिर मस्जिद यांच्या फोटोचा गैरवापर करू नये, सोशल मीडियावर काही आक्षेपरह बाब आढळून आल्यास लगेच नांदुरा पोलिसांना माहिती द्यावे डायल ११२ निशुल्क फोन नंबर वर माहिती द्यावे, आक्षेपरह पोस्ट कोणीही वायरल, फॉरवर्ड, लाईक करू नये, जे कोणी वाईट अफवा पसरावीत असेल बदनामी करीत असेल त्वरित पोलिसांना माहिती द्यावे आपसात वादविवाद भाडणंतंता करू नये नांदुरा तालुक्यात सर्वजनिक शांतता सदैव आबाधित ठेवावी, सामाजिक सलोखा बंधू भाव चांगला ठेवावाया बाबत काल आणि आज हि नांदुरा शहरात घासमंडी चौक , दक्षता चौक, मोतीपुरा चौक, वडनेर बसस्टॅन्ड, चांदुर बिस्वा चौकीवर, तिकोडी गावामध्ये मोहोला मिटिंग कॉर्नर मिटिंग घेवून सर्व नागरिक यांना राज्यात कोठे हि काहीही वाद झाले तरी आमच्या वॉर्ड आमचा मोहोलला आमचे गाव आमचा तालुका आम्ही शांत ठेवू कोणताही धार्मिक वादतंटा आम्ही करणार नाही असे नागरिक यांनी हि नांदुरा पोलिसांना आश्वासन दिले आहे सम्पूर्ण तालुक्यात सर्व गावात याप्रमाणे नांदुरा पोलीस हे जनजागृती करीत आहेत त्यांना जनते कडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे तसे पोस्टर बॅनर द्वारे हि नांदुरा पोलीस जनजागृती करीत आहेत,
पोलीस निरीक्षक विलास पाटील पो स्टे नांदुरा


