मारोती सुर्यवंशी
तालुका प्रतिनिधी नायगाव
नांदेड जिल्ह्यातील एक ज्येष्ठ मुरब्बी राजकारणी माजी खासदार व माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या हजारो राजकीय शिलेदारांना सोबत घेऊन नांदेड जिल्ह्यातील राहिलेले विकास कामे मनार धरण या सह लेंडी प्रकल्पासह पाणी नियोजनाचे प्रश्न, शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा व नांदेड सह मराठवाड्यात हरीत क्रांती घडवून दुष्काळ दुर करण्यासाठीचा उद्देशाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 23 मार्चला नरसी येथील राज्यांचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत त्यांच्या सह माजी आमदार आ.ओमप्रकाश पोकर्णा, माजी जि.प.सदस्य मिनलताई खतगावकर, जवळपास शेकडोंच्या संख्येने सरपंच, नगरसेवक,प.स. सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहेत.आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत याबरोबरच प्रगाढ अनुभव असणारे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या सेक्युलर विचारांने प्रेरीत होऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे म्हणून सर्वश्रुत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात बळकटी मिळणार आहे यांत तिळमात्रही शंका नाही.


