शिवसैनिकाकडून आभार व्यक्त
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली- शासकीय कामे, साधन सामुग्रीची खरेदी, इत्यादीमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी शासकीय खरेदी कामे इत्यादी करिता ई-निविदा
उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक ७ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु.१० लक्ष ( सर्व कर अंर्तभूत करुन ) व त्यापुढील खरेदीसाठी ई – निविदा पध्दतीचा अवलंब करणे अनिवार्य करण्यात आलेला आहे.
शासकीय कामे, साधन सामुग्रीची खरेदी, इत्यादीमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी शासकीय खरेदी कामे इत्यादी करिता ई-निविदा पध्दतीचा अवलंब करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ६ ऑगस्ट, २०१० रोजीच्या शासन निर्णयाव्दारे घेण्यात आलेला आहे . सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २६ नोव्हेंबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे रु .३ लक्ष पेक्षा जास्त किंमतीच्या निविदेकरिता ई-निविदा पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक २७ सप्टेंबर , २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई – निविदा प्रक्रीयेअंतर्गत रु .३ लक्ष रकमेवरील कामे ई-निविदा प्रसिध्द करुन प्रचलित कार्यपध्दतीनुसार सदर निविदेसंदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ११ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ई – निविदा संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने दिलेले सर्व आदेश अधिक्रमीत करुन यापुढे ई – निविदा संबंधीत कार्यवाही उद्योग उर्जा व कामगार विभागाने खरेदी संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. शासन निर्णय क्रमांका सीएटी -२०१७ / प्र.क्र .८ / इमा -२ उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक ७ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु.१० लक्ष ( सर्व कर अंर्तभूत करुन ) व त्यापुढील खरेदीसाठी ई – निविदा पध्दतीचा अवलंब करणे अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यास अनुसरुन सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ११ मे , २०२१ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे देण्यात आलेल्या सूचनांस अनुसरुन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २६.११.२०१४ च्या शासन निर्णयानुसार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक २७.९ .२०१८ मध्ये नमूद केल्यानुसार रु .३ लक्ष रकमेवरील कामे ई – निविदा पध्दतीने करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत . आता या निर्णयाव्दारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांकरिता रु . १० लक्ष ( सर्व कर अंर्तभूत करुन रकमेवरील कामांकरीता ई – निविदा पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे.
या निर्णया बद्दल गडचिरोली शिवसेना पदाधिकारी किशोर पोद्दार गडचिरोली जिल्हा जनसंपर्क प्रमुख, रामकृष्ण मडावी उपसंपर्क प्रमुख, राजगोपाल सुलावार शिवसेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख रियाज शेख, धर्मराज राय उपजिल्हाप्रमुख, विलास ठोंबरे चामोर्शी शिवसेना ज्येष्ठ नेते, अरुण दुर्वे अहेरी विधानसभा प्रमुख, बिरजू गेडाम अहेरी विधानसभा जनसंपर्क प्रमुख, सुभाष घुटे शिवसेना तालुकाप्रमुख अहेरी ग्रामीण, अक्षय करपेत तालुका प्रमुख शहर, उपतालुका प्रमुख अहेरी प्रफुल एरणे, तसेच सर्व शिवसैनिक यांच्याकडून मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांचा आभार व्यक्त करण्यात आला.


