महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.12:- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बचत भवनाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.याप्रसंगी महिला मेळावा, आरोग्य तपासणी शिबीर आणि दिव्यांग मार्गदर्शन आदी कार्यक्रमही घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सांसद आदर्श ग्राम पंचायत चंदनखेडा व राणी हिराई प्रभाग संघ उमेद विभाग पंचायत समिती भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ.बंडू आकनूलवर होते. अध्यक्षस्थानी उमेद चे ब्लॉक मिशन मॅनेजर अरुण चौधरी होते. मंचावर प्रामुख्याने बाल विकास अधिकारी स्नेहल चार्लॅकर, जिल्ह्य दिव्यांग समन्वयक अमोल मारतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली राजुरकर, प्रभाग संघ अध्यक्ष उषा शेंडे,कोषाध्यक्ष मनिषा सोयाम,तालुका व्यवस्थापक रजनी खोब्रागडे,प्रभाग समन्वयक हर्षा नागतुरे, भूषण चिलकेवार,शाखा व्यवस्थापक राजकुमार बुऱ्हाण, सधम्म फुलझेले, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश रामटेके ,तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर हनवते, सर्व ग्रामपंचायत सदस्य इ.उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या प्रतिमेला मालार्पण व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. मनरेगा योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या महीला बचत भवनाचे लोकार्पण मान्यवराचे हस्ते करण्यात आले.राणी हिराई प्रभाग संघ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे कॅडर,समूह, उत्पादक संघ, ग्रामसंघ, बँक अधिकारी, ग्राम पंचायत इत्यादीना सन्मानचिन्ह देऊन मान्यवराचे हस्ते सत्कार करण्यात आला. ग्राम पंचायतीने १०० टक्के कर भरणा करणाऱ्या कुटुंबाचा डस्टस्टिन देऊन सन्मान करण्यात आला.प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडाचे वतीने २८७ महिला व दिव्यांगाची आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी राजुरकर यांनी महिलांना निरोगी राहण्यासाठी घ्यावयाची काळजी ,आजार तपासणी,उपचार याबाबत माहिती दिली. दिव्यांग समन्वयक अमोल मारतकर यांनी दिव्यांग यांचे करीता शासनाच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले .उद्घाटनीय भाषणात सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात राज्य शासनाच्या शंभर दिवसाचा सात कलमी कृती कार्यक्रम राबविण्यात येत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.बाल विकास अधिकारी चार्लेकर यांनी महिलांना महिला दिन पार्श्वभूमी, महिलांची सुरक्षा आणि भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.बँक मॅनेजर यांनी आर्थिक साक्षरता व बँक कर्ज याविषयी उपस्थित महिलांना माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात अरुण चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि उमेद यांचे समन्वयातून कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम करून इतर ग्राम पंचायती पुढे आदर्श निर्माण केला याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम पंचायत अधिकारी प्रकाश रामटेके यांनी केले तर संचालन भारती उरकांडे व आभार हर्षा नागपूरे यांनी केले.सहभागी महिलांसाठी वयक्तिक व सामूहिक नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये उत्तम सादरीकरण करणाऱ्या महिलांना बक्षीसे देण्यात आली.


