भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – आष्टा गावचे प्रतिष्ठीत नागरिक उत्कृष्ट शेतकरी तसेच एक महत्वकांक्षी शिक्षक यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी विविध जिल्ह्यांतुन आप्तस्वकीय व त्यांचे वर्ग मीत्र आणि मीत्रपरीवर शिक्षकगण बहुसंख्येने उपस्थित होते. गोकुळदास वंजारे यांच्या श्रद्धांजलीपद बोलताना त्यांच्या कर्तृत्वाचा गुणगौरव करतांना शिक्षकांचे शिक्षक अशा दु:खद भावना व्यक्त करत आदरांजली अर्पण केली. विविध पुरस्काराने सन्मानित असलेले गोकुळदास वंजारे यांच्या आष्टा गावचे विकास भिमुक तथा माहुर नगरीचे माझी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे अंत्यविधी यात्रेत सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गोकुळदास वंजारे यांच्या अंत्यविधीला हजेरी लावली अंत्यविधी दिं.७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता सुरूवात होऊन त्यांच्या शेतात दुपारी ४:३० वाजता पोहचली.विविध मान्यवरांनी आपल्या सहावासातील दु:खद भावना व्यक्त करताना संथागार अनाथाश्रमचे संस्थापक आरुण आळणे यांनी आपली भावुक श्रद्धांजली अर्पण केली.तसेच गोकुळदास वंजारे यांना पुरस्कार तर भरपूर मिळाले परंतु अवघ्या दोन दिवस आदोगर पडसा गावचे प्रतिष्ठीत नागरिक वसंता गायकवाड यांनी घरी येऊन पुरस्कार प्रदान केला असल्याचे नातेवाईकांकडून कळाले. गोकुळदास पांडुरंग वंजारे यांच्या पश्चात एक मुलगा,किरण करुणा वंजारे, तीन नातवंड असुन आप्तस्वकीय नाते मंडळी भरपूर असा सोयर संबंध असुन समाजबांधवातील सखा अनंतात विलीन झाला आहे.

