रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
गतजन्मातील केलेल्या चुकांची शिक्षा भोगण्या करिता जन्माला येऊन भोग संपल्यानंतर देहत्याग करून वासनावशेषांने पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात जन्म घेऊन मृत्यू ग्रस्त होतात.अर्थातच मनुष्येत्तर प्राण्यांच्या जीव नात काहीच ठरलेले नसल्या मुळे ते जन्माला येतात आणि मरतात. तर काही प्रयत्नवा दी व्यक्तीमत्व जन्मालाआल्या नंतर उच्चध्येय निश्चित करून,आजन्म ते ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टि कोनातून अहोरात्र धडपड करून एक दिवस ती यशाचे शिखर पादाक्रांत करीत असतात. ज्ञानेश तुकोबाराया दि संत मात्र कार्य ठरवूनच या अवनीतलावर अवतीर्ण होत असतात.असे अभ्यास पूर्ण मत श्री ज्ञानेश्वर महा राज वाघ यांनी मांडले.ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री. ज्ञानेश आश्रम श्री क्षेत्र वारी भैरवगढ येथे आयोजित गाथा पारायण तथा प्रवचन ज्ञानयज्ञ सप्ताहातील पंचम पुष्प गुंफित असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात अनेक तथाकथित लोक स्वतःच्या मुखाने आम्ही अवतारी संत असल्याचे सांगताना दिसून येतात. वास्तविक पाहता अवतार या चहू अक्षरी शब्दा तील प्रत्येक अक्षराचे स्वतंत्र अर्थ ध्वनीत होतात. अ – अंतर्यामित्व , व वरदत्त्व , त तारकत्व , र रक्षकत्व हे चारही गुण एकत्रितरित्या ज्यांच्यामध्ये दिसून येत अस तील त्यांना अवतारी संत म्हणण्यास हरकत नाही. वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक संतांच्या अंगी उपरोक्त चार ही गुण ओतप्रोत भरल्याचे त्यांच्या जीवनचरित्र वाचना च्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल.असे अनेक उदाहरणे देऊन महाराजांनी वारकरी संतांचे अवतारित्व सिद्ध करून दिले तसेच रात्री च्या किर्तनामध्ये श्री.संतोष महाराज टिकार यांनी नैमि त्तिक विषयावर प्रकाश टाकु न महाशिवरात्री पर्वकाळाचे महत्व उपस्थितांसमोर विशद केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.


