भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – पैनगंगा नदी पात्रात शिवपुराण कथा सप्ताहात गरीब कुटुंबाचे विदर्भातील साकुर वासीयांनी आदर्श असा स्तुतीमय उपक्रम हाती घेतला असून भारुड कार श्री दत्ता संभाजी काकडे यांच्या नियोजनात पैनगंगा नदी पात्रात वाजत गाजत नवरदेवाची वरात काढली आणि वराती मध्ये वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या पोषाखामध्ये वासुदेव बाल कलाकार वासुदेच्या पोषाखात,शिव शंकर माहादेव स्वरूपात बाल कलाकार स्वराज दत्ता काकडे यांच्या समवेत आदी कलाकारांच्या समवेत साकुर गावकरी मंडळी यांनी भक्तीमय आणि प्रसन्न अशा वातावरणात गरीब कुटुंबाचे लग्न लावले संगीत मय मंगलाष्टके कथाकार महाराज विठ्ठल भोयर यांनी आपल्या गोड स्वरातुन गायन करुन उपस्थित भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले तबला वादक प्रभाकर डोळस यांनी तर उत्कृष्ट वाजवत भाविक तर डोलायला लागले.हारमोनियम वादक दिपक बिडवाई आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय सुंदर असे सादरीकरण केले.गरीब कुटुंबाचे लग्न लावून त्या कुटुंबातील आर्थिक खर्च वाचवून साकुर वासीयांनी उपस्थित भाविकां समोर आणि जनसामान्यांच्या मनात आदर्श निर्माण केला आहे.अन्न दात्यानी विशेष मेजवानी दिली अन्न दान करणारे मौजे नेर गावचे पोलीस पाटील नितीन भोयर, प्रतिष्ठीत नागरिक श्रीराम पाटील जगताप, दादाराव जगताप, यांनी शिवपुराण कथा सप्ताहात लग्न असल्याने उस्ताहात विशेष भोजनाची मेजवानी दिली.

