मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज सभागृहामध्ये दिनांक 23 2 2025 रोजी आकोट व तेल्हारा तालुक्यातील दिव्यांगांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटक श्री दिलीप सरदार सर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री संजय बर्डे सर राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित सर प्रमुख अतिथी जि प सदस्य गजानन दादा पुडकर श्री अविनाश वडतकर श्री श्याम हिंगणकर तसेच सावरा ग्रामपंचायत सरपंच स्वातीताई वैभव गुजरकर उपसरपंच धीरज गीते मंचनपूर ग्रामपंचायत सरपंच निर्मलाताई दत्तात्रय चौधरी देऊळगाव ग्रामपंचायत सरपंच सौ पूजाताई सागर गहले तसेच सुशीला घुगे सौ जिजा धांडे श्रीमती बेबीताई महल्ले सौ अरुणा राजुरकर प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन श्री महेंद्र राऊत सर तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ मंगला धांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ संगीता पुनकर यांनी केले यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा दिव्यांग कर्मचारी संघटना व बेरोजगार संघटनेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी श्री गजानन दादा पुंडकर सौ स्वातीताई गुजरकर श्री बरडे सर व प्रमुख मान्यवरांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या तीन टक्के राखीव निधी संदर्भात उपस्थित सरपंच समोर निधी वितरण संदर्भात सूचना केल्या तसेच यावेळी अपंगांच्या विविध प्रश्नांच्या समस्या अडचणी बाबत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व समस्या जाणून घेतल्या यावेळी अकोट तालुक्यातील बहुतांश दिव्यांग बांधव उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यक्रमाला अल्पोहार व्यवस्था करण्यात आली होती सदर कार्यक्रमाकरिता व यशस्वी करण्याकरता सौ सुनीता ताई कबाळे सौ रिता ताई मुरकर सौ मुक्ताताई पुनकर सौ वर्षा ताई पुनकर सौ मंगलाताई काळे सौ कल्पनाताई सपकाळ तसेच कार्यक्रमाकरिता भरीव योगदान श्री गजानन राऊत गजाननराव कबाळे श्री विठ्ठलराव ठाकरे गजाननराव देशमुख श्री मनोज काळे करण मुरकर श्री मनोज भगत अमोल भगत आदींनी कार्य मला सहकार्य करून दिव्यांग अपंग मेळावा यशस्वी केला.


