केशव सातपुते
ग्रामीण प्रतिनिधी लोणार
लोणार : तालुक्यातील किनगाव जट्टटु येथील अखिल श्री स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्रामध्ये धोबी समाज बांधवांनाच्य वतीने संत गाडगे महाराजांची जयंती 23 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच श्रीमती शारदाबाई महाजन होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ वाघमारे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष शामराव सातपुते सर, अशोक साळवे, लक्ष्मण काळबांडे, दैनिक लोकमतचे पत्रकार काशिनाथ राऊत, शिवाजी राऊत होते, यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तदनंतर राजेश नागरे यांनी प्रास्ताविक केले, यावेळी ऋषिकेश सातपुते, विश्वनाथ वाघमारे, विनोद सातपुते यांनी आपले विचार व्यक्त केले, तसेच गाडगे बाबांचे विचार अंगीकृत करण्यासाठी, मागील वर्षी प्रत्येक वर्गामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या, विद्यार्थ्यांचा शिवाजी राऊत यांच्याकडून बक्षीस देऊन गौरव करण्यात आला, कार्यक्रमाच्या शेवटी गाडगे महाराजांचे आरती करण्यात आली , व तदनंतर उपस्थित त्यांना नाश्ता देण्यात आला, कार्यक्रमाला निलेश महाजन, राजाभाऊ राऊत, शरद राऊत, , माधव सातपुते, विजय राऊत राजु जाधव यांच्यासह अनेक युवा तरुण उपस्थित होते.

