निलेश सोनोने.ग्रामीण प्रतिनिधी पातुर
पातुर पंचायत समिती अंतर्गत सुकळी येथे शासकीय जागा ग्रामपंचायतीने दोन भोगवटदाराच्या नावावर केल्याचे चौकशी अहवालातून उघड झाली असून कारवाईसाठी पातुर चे गटविकास अधिकारी सुनीता इंगळे यांनी उपकार्यकारी अधिकारी यांच्याकडे नुकतेच अहवाल सादर केला आहे सुकळी येथे शासकीय जागेचा आठ अ फेरफार करून 584/आणि 5 85/या मालमत्ता क्रमांक वरील स्वतः मालकीच्या नावावर केल्याचा आरोप प्रमोद धोंडीराम वाडी यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधितांना दिलेल्या तक्रारीतून केला होता.शासकीय जागेची मालमत्ता क्रमांक585/एकूण क्षेत्रफळ/875 चौरस फूट असे आहे दोन भोगवटाराच्या नावाने केल्याचे ग्रामपंचायत च्या सन 2021 2022 चे जमिनीचे कर आकारणी नोंदवही नमुना क्रमांक आठ चे मूळ अभिलेखावरून उघड झाल्याचे निष्पक झाले आहे सदर अहवाल कारवाईसाठी पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी उप कार्यकारी अधिकाराकडे सादर केला आहे यावर काय कारवाई होते याकडे सुकळी वासियांचे. लक्ष लागले आहे तत्कालीन सचिवाचा प्रताप उघड शासकीय जागा दोघांच्या नावावर केल्याचा प्रताप तत्कालीन सचिव आर जी घटोळे यांच्या कार्यकाळात करण्यात आला असून तसेच कार्यरत सचिव विडी.खाकरे यांनी दिलेल्या बयानातून निष्पन्न झाले आहे सदर अहवाला कार्यवाहीसाठी उप कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.कार्यवाही कधी होणार .सुकळी येथे शासकीय जागा दोन भोगट द्वाराच्या नावाने केल्याचा धक्कादायक प्रकार अहवालातून उघड झालेला आहे मात्र यावर काय कारवाई होते आणि कोणावर होते याकडे सर्व तालुका वासियांचे लक्ष लागलेले आहे

