पवन ठाकरे
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे आज दि.21 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरच्या व्हाल मधे प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर व शेतकरी शेतमजूरांच्या प्रलंबित प्रश्नांवर कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.शेतकरी शेतमजूरांच्या प्रलंबित प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी व कापूस सोयाबीन भाव वाढ तसेच कर्जमाफी बाबत आंदोलनात्मक चर्चा करण्यात आली.तसेच evm चा आश्रय घेत.पैशाच्या आणि दादागिरीच्या भरवशावर निवडणुका जिकंता येतात पंरतु शेतकरी शेतमजूरांना न्याय देण्यासाठी जातिवंत चळवळीतील कार्यकर्ताच लागतो हे काळ्या दगडावरची रेष आहे असे मत प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले. जळगाव जा.विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या न्याय हक्कासाठी 16 वर्षांपासून संघर्ष करुन निवडणुकीत पराभव पत्करावा लागतो हा शेतकरी चळवळीला लागलेला छापच आहे.हा पराभव दुसरा तिसरा कोणी केला नसुन आपला पराभव evm ने केला आहे. त्यामुळे पराभवाचा पच्छाताप न करता पुन्हा कामाला लागा. संग्रामपूर, जळगाव, व शेगाव तालुक्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपरिषद निवडनुक सर्वच जागा ताकतीने लढु असे सर्वानुमते कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले.मतदारसंघातील वाढलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी गावचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक कार्यकर्ताने सज्ज व्हा.शासनाचे निकृष्ट होणाऱ्या बांधकामाला कडाडून विरोध करा. बोगस काम करणाऱ्या कमीशन खोऱ्या ठेकेदारांना लगेच लगाम लावा.लोकप्रतिनिधींनी मतदान घेण्यासाठी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष न करता त्याची दिसतील तिथे त्यांना जाणिव करुन द्या. जिगाव प्रकल्पाच्या नावाखाली मुळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संपत्तीचे कमी मुल्यांकन काढुन त्यांचेवर अन्याय केला आहे. सत्ताधारी,अधिकारी व ठेकेदारांनी शासनाच्या करोडो रुपये स्वतःच्या घशात घेतले. यांना धडा शिकविण्यासाठी व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याचे प्रशांत डिक्कर यांनी बैठकीत बोलतांना सांगितले. ज्यांनी निवडणुक दरम्यान बेसुड आरोप केले. त्यांचा अचुक हिशोब घेणार असुन पाठीमागुन वार करणाऱ्यांचे लवकरच कपडे काढुन त्यांना रस्त्यावर आणु असा विरोधकांना सज्जड दम भरला. आमचे कार्यकर्ते फाटके असले तरी ते राजु शेट्टी यांच्या तालमीत घडलेले आहेत. आणि छत्रपती संभाजी राजे महाराज यांचा हात आमच्या डोक्यावर आहे. त्यामुळे आम्ही चळवळीतील कार्यकर्त्ये असल्या फुटार लोकांना भिक घालत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत सर्वच जागेवर उमेदवार उभे करणार असुन निवडणुक ताकतीने लढविणार असल्याचे सांगत आज पासुन कामाला लागा. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी तुटून पडा असे प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बैठकीत बोलतांना सांगितले. यावेळी उज्वल पाटील चोपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वखारे, मोहन पाटील, प्रविण पोपटनारे, अक्षय वाकोडे,गोपाल तायडे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले, विजय काळपांडे, गौरव जळमकार, संतोष खेर्डे, गणेश मालोकार, विलास तराळे, बाबुराव वेरुळकार,कलिमोद्दीन काझी,विलास तराळे, अंकुश सुलताने,गोपाल रोहनकार, नारायण कुरवाडे, राजु बोरोकार, राजु उमाळे, सुरेश मुजलदा,, महादेव चवरे,नानाराव अरबट,अमोल मारोडे,अमोल येडाके, मंगेश मानकर,आकाश कोठे,पुंडलिक वाघ,विनोद उमाळे,हरिष केदार,शहिद केदार, गजानन आमझरे,सागर पाटील,धनंजय कोरडे, संतोष पाटील,अमोल सोनोने,अरुणभाउ मुरुख,अनिल दिंडोकार,रामरतन उमाळे,मुकुंदा कोकाटे,राजु खारोडे,गफुर पाले,मोसीम सुरत्ने,शिवाजी चिकटे,विजय जमरा,विष्णू गोल्हर,ज्ञानेश्वर खराटे,गणेशराव धामोळे,संतोष दाणे,शरद अवचार,गोलु घटे,सुपडा सोनोने,विशाल चोपडे,विष्णू चितोडे,श्रीकृष्ण बोरोकार गजानन पांडव,सुरेश वाघ,निळु हागे,वैभव मुरूख,विशाल मुरूख,बाळुमामा वाघ,स्वप्निल भगत,संतोष गाळकर यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

