सुधारित अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश
रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागांव : गुंज ते मोहदी रोडवरील माळेगांव अंतर्गत असलेल्या शिपनदिवरील पुलाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे.या पुलाची पाहणी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली असता सदर पुलाचे बांधकाम चुकीचे होत असल्याने पुलाच्या निर्मितीसाठी सुधारीत अंदाज पत्रक त्वरित सादर करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.सबंधित कामांसाठी दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात येणार असुन पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पुर्णत्वास जाईल असे आश्वासन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले मागील दोन वर्षापुर्वी गुंज ते मोहदी रोडवरील माळेगांव शिप नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी आमदार असतांना बांधकाम मंजूर केले होते.बांधकामाचा आराखडा चुकीच्या पद्धतीने केला असल्याने नदीच्या पात्रातील पावसाळ्यात पुराचे पाणी पुलाच्या गळ्यातुन जाउ शकत नाही.त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजु रखडल्या जाऊन पुल नसल्यातच जमा होणार आहे.करीता पुलाची लांबी वाढविणे गरजेचे आहे.असी प्रतिक्रिया प्रा.शिवाजी सर यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या निदर्शनात आणुन दिली.पुला अभावी परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याचे राज्यमंत्री म्हणाले.यावेळी सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता , मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रा.शिवाजी राठोड सर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष क्रांती कामास्कर,भिकन राठोड,वसंत चव्हाण,अॅ.महेश राठोड आदी उपस्थित होते.

