भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – मराठवाडा आणि विदर्भात परीचीत असलेल्या नेर व साकुर या गावकरी मंडळी यांनी आपल्या चौव भौवताल असलेल्या गावकरी मंडळी च्या सहकार्याने शिव मंदिर समोर पैनगंगा नदी नेर व साकुर येथे शिवपुराण कथा सप्ताहाला पहील्यांदाच सुरुवात केली आहे. या आगोदर ईथे माहाशिवरात्री निमित्त आजु बाजुच्या खेडे विभागातील व काही शहरी विभागातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली तसेच महाशिवरात्री निमित्त भजनांचा कार्यक्रम होत असत त्याच बरोबर महाशिवरात्री उपवास प्रसाद तसेच महाप्रसाद सुध्दा असयचा आणि भक्तगण मोठ्या मनोभावे ईथे हजेरी लावतात. नयनरम्य दृश्य पैनगंगा बेट पैनगंगा वाळवंट वाहते पाणी आणि भक्तीरसात मग्न असलेले भक्तगण अशी माता पैनगंगा नदी. पवित्र पैनगंगा नदीच्या वाळवंटात शिवमंदिर समोर अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् भागवत शिवपुराण कथा ज्ञानयोग सप्ताहाचे आयोजन पुढील गावकरी मंडळी यांनी केले आहे,नेर,साकुर,लिबांयत,कोसदनी,मुकींदपुर,अबोंडा,भोसा,तिवरंग,लांजी,कवठा बा, टाकळी या सर्व गावकरी मंडळी च्या सहकार्याने शिवपुराण कथा सप्ताहाला सुरूवात झाली आहे श्री श्रेत्र माहुर गड येथुन उत्तरेला जवळच म्हणजे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर नेर गाव आहे आणि केवळ दोन किलोमीटर कच्चा रस्ता असुन लांजी बाय पास मार्गावर लांजी चौफुवरुन उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावरआहे.आणि ते नेर गाव म्हणजे पैनगंगा नदी तिरावर असलेले छोटेसे गाव पण या गावापासून केवळ सातशे मीटरच्या अंतरावर पैनगंगा नदी शिवमंदिर आहे नयनरम्य वाळवंट बेट आणि वाहते पाणी अशा नयनरम्य ठिकाणी महाशिवरात्री निमित्त किर्तनकार आणि भजनी मंडळ असे भरगच्च कार्यक्रम वरील गावकरी मंडळी यांनी आयोजीत केले आहे.२१ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली असून २८ फेब्रुवारी रोजी काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन साकुर,मुकिंदपुर,नेर,लिबांयत,भोसा,तिवरंग, कोसदनी, टाकळी,कवठा बा,लांजी, माहुर,धनोडा,दहीसावळी, आष्टा,वडसा,व समस्त गावकरी मंडळी यांनी आयोजीत केले आहे. आणि शिवपुराण कथा श्रवण करावे असे भाविक भक्तांना आग्रहाचे निमंत्रण आहे. श्री श्रेत्र माहुर गडावर कैलास टेकडीवर महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आणि बरेच भाविक पैनगंगा नदी शिवमंदिर नेर, साकुर येथे पण दर्शनासाठी येत असतात भाविकांना प्रवास करण्याची सुविधा नसल्याने अॅटो रिक्षाचा अवलंब करावा लागतो म्हणून माहुर आगाराने महाशिवरात्री निमित्त नेर माहुर एसटी बस सोडल्यास ईथे पण लाखोंच्या जवळपास भाविक दर्शनासाठी येतील व माहुर आगाराच्या उत्पन्नात भर पडेल व माहुर ते नेर रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास भाविक भक्तांना दर्शनासाठी येणे जाणे सोईस्कर होईल वाहन तळासाठी भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध आहे.सध्या कचा रस्ता असला तरी एसटी बस धावु शकते.आणि जर माहुर आगाराने महाशिवरात्री च्या दिवशी एक दोन बस माहुर ते नेर सोडल्यास लाखच्या जवळपास भाविक दर्शनासाठी येतील अशी भाविकांची अपेक्षा आहे.

