संजय शिंदे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
.इंदापूरः पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात न्हावी गावाच्या हद्दीमध्ये वालचंदनगर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अफूची शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणात अफूची बोंडे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीच्या सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाच्या बोंडासह अफुची झाडे हस्तगत करून तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले. रतन कुंडलिक मारकड (वय ५०), बाळु बाबुराव जाधव (वय ५४, दोघे रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे) आणि कल्याण बाबुराव जाधव (वय ६५, रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.इंदापूर तालुक्यातील न्हावी गावाच्या परिसरामध्ये अफूची शेती केली जात असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांनी मिळाल्यानंतर वालचंदनगर पोलिस व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी भल्या सकाळी छापा टाकला. यावेळी न्हावी परीसरातील काही शेतकरी आडबाजुला शेतामध्ये मकेच्या पिकाच्या आधाराने अफूची शेती करीत असल्याची आढळले.शुक्रवारी दिवसभर पोलिसांचा मोठा फौजफाटा न्हावी गावाच्या परिसरामध्ये दाखल झाला होता. न्हावी गावाला पोलीस छावणीचे शिवारांमध्ये अफूची शेत अफूच्या शेतीच्या मालंकावर कारवाई करीत होते. पोलिसांनी अफूची बोंडे व झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस अॅक्ट कलम ८ ब, १५, १८, ३२,४६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.नि. वैशाली पाटील, स.पो.नि. राजकुमार डुणगे, स.पो.नि. कुलदीप संकपाळ, स.पो.नि. राहुल गावडे, पोलीस अंमलदार स्वप्निल अहीवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगड्डु विरकर, आसिफ शेख, रामदास बाबर, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, महेश बनकर, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विभीषण सस्तुरे, पो.स.ई. विजय तेळकीकर, पोलीस अंमलदार रविंद्र पाटमास, बापू मोहिते, गुलाब पाटील, शरद पोफळे, विक्रमसिंग जाधव, अभिजीत कळसकर, गणेश बनकर, महिला पोलीस अंमलदार स्मिता गायकवाड, मेघा शिंदे यांनी केली आहे.


