रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव : तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग घेऊन गोरगरीब जनतेला न्याय देण्याच्या हेतूने काम करत असलेल्या प्रतीक पाटील नरवाडे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .महागांव येथील रहिवासी प्रतीक पाटील नरवाडे हे नेहमी सामाजिक उपक्रम घेत असतात. नागरिकाच्या जनतेच्या हितासाठी आंदोलन छेडणे, रास्ता रोको करणे व त्यांना न्याय देणे हा त्यांचा अजिंठा असतो. त्यांच्या या चांगल्या कामाची पावती म्हणून यशवंत संघर्ष सेनेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील यशवंत संघर्ष सेनेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो. त्याच अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या यंदाच्या त्रिशताबद्धी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी प्रतीक पाटील नरवाडे हे समाजसेवेमध्ये नेहमीच अग्रेसर असल्यामुळे यांची यशवंत संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सदर राजेस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर केले आहे. सदर पुरस्कार ९ मार्च रोजी हिंगोली शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात येत आहे.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांचे सर्व स्तरावरुन कौतुक केले जात आहे.


