सिध्दार्थ कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी शहरातील अखिल भारतीय पद्मशाली समाजाच्या वतीने राज्यसभेचे खासदार डॉ.अजित गोपछडे यांना लेखी निवेदन देऊन सन १९९४ साली शासनाने विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती केली.असून तसा निर्णय ही शासनस्तरावर घेण्यात आला. सदर दोन टक्के आरक्षण देण्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने शासनाने उच्च व तंत्रशिक्षणासाठी विशेष मागास प्रवर्गास संदर्भ १ च्या शासन निर्णयानुसार आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी योग्य अंमलबजावणी झाली नाही ही बाब शासन निर्णयाचे उल्लंघन करणारी असून विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी यांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय पद्मशाली समाज बिलोली तालुका कार्यकारणीच्या वतीने देण्यात आली आहे.निवेदनावर खालील पदाधिकाऱ्यांचे स्वाक्षरी आहेत. डॉ.प्रशांत गंगाधरराव सब्बनवार सचिव
मार्कंडेय एज्युकेशन सोसायटी,कुंडलवाडी. गणेश गूरूपवार सचिव अखिल भारतीय पद्मशाली समाज संघटना तालुका बिलोली

