सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा : तालुका पत्रकार संघटनेची गोडोली येथील सातारा जिल्हा पत्रकार भवन येथे पार पडली. यावेळी पत्रकारांना सातत्याने येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि काम करताना आवश्यक कायदेशीर मार्गदर्शनाची आवश्यकता असते. यासाठी ॲड.संभाजी पाटील यांची कायदेशीर मार्गदर्शक , सल्लागार पदी एकमताने निवड करण्यात आली. ते सेवानिवृत्त पोलिस उपविभागीय अधिकारी आणि विविध उच्च विद्याविभूषित आहेत. ॲड.संभाजी अच्युराव पाटील यांची सातारा तालुका पत्रकार संघटनेसाठी कायदे विषयी सल्लागार म्हणून संघटनेच्या सर्व सदस्यांनी मान्यता देवून त्यांची नियुक्ती केली. यावर ॲड. संभाजी पाटील यांनी,” पत्रकार बांधव हा समाजाला दिशा देत असून त्यांच्यासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून संधी मिळाली असल्याचे सांगितले. ॲड. संभाजी पाटील यांच्या निवडीबद्दल पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे , सातारा पत्रकार संधाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अजय कदम, विजय जाधव, सुनील साबळे, राहूल ताटे-पाटील, वसंत साबळे, बाळू मोरे, गुलाब पठाण, सतिश जाधव, प्रविण राऊत तर शहर पत्रकार संघटनेची अध्यक्ष समाधान हेंद्रे, गजानन चेणगे, चंद्रकांत देवरुखकर, ज्ञानेश्वर भोईटे,गौरी आवळे, अमित वाघमारे, प्रतिक भद्रे, आणि पत्रकारांनी अभिनंदन केले.

