शेख शेमशुध्दीन
तालुका प्रतिनिधी मुदखेड
मुदखेडचे ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गंगाधर डांगे यांना वैदर्भीयनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या ” मराठवाडा भुषण ” पुरस्काराने दि. २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबां यांच्या जयंती दिनानिमित्त महेश भवन श्री क्षेत्र लाड कारंजा जि. वाशिम येथे पार पडलेल्या “सत्कार सेवाव्रतींचा ” कार्यक्रमात आ.सईताई डहाके यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. वैदर्भीयनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पहिल्यांदाच राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई प्रकाशदादा डहाके या होत्या तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून मुर्तिजापूर विधान सभेचे आमदार हरिषजी पिंपळे,विदर्भ लोक कलावंत संघटनेचे अध्यक्ष संजयजी पडोळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेशजी सोमानी , गजानन कृषी बाजार समिती वाशिमचे संस्थापक अध्यक्ष गिरधारी लाल सारडा तर वैदर्भीयनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्षा सौ.पुनम पवार, सचिव एकनाथ पवार हे उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते रामदास काळे ,चंद्रपूर शाहीन पटेल सुलतानपूर , डॉ. सुवर्णा झिलपे अमरावती ,अमृता पचांगे वाशिम ,यांना महाराष्ट्र भूषण तर केंद्रीय माहिती अधिकार अथोरीटी भारत सरकारच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा शितल शेगोकार शेगाव , डॉ. मुजफ्फर खान, आशाताई मेश्राम,यांना विदर्भभूषण तर तालुका मुदखेड जिल्हा नांदेडचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर डांगे यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या सत्कार सेवा वृत्तींचा या कार्यक्रमास समीर देशपांडे ,नेमीचंद पवार ,प्रतिभा वानखेडे , राजेश आंधळे , ह भ प गोपाल किलोरकर , संतोष शेलकर , अमोल आश्रम , भारती भोरे , दिनेशचंद्र शुक्ला , शाम वानखेडे , सुधाताई चौरे, प्रकाश गवळीकर ,विजय खंडार, मंगला नागरे, संजय भुजाडे , प्रतीक मलवडकर, रमेश देशमुख, स्वप्निल येवतीकर, संजय कडोळे, पंजाबराव राऊत, शकील मिर्झा, गोपाल काकड, योगेश ठाकरे, सिद्धार्थ चौदंते, जेष्ठ पत्रकर मनोज कमटे, संतोष सावंत यांच्यासह महाराष्ट्रातून अनेक मान्यवर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुदखेड चे ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गंगाधर डांगे यांनी मागील तीस वर्षाच्या कार्यकाळात समाजभिमुख लेखन करून अनेक विषयांना वाचा फोडली व पत्रकारितेवर अवलंबून न राहता व्यवसाय व उद्योग क्षेत्रात मोठी आघाडी घेऊन ग्रामीण पत्रकारांपुढे वेगळा आदर्श ठेवल्यामुळे त्यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पत्रकार गंगाधर डांगे यांना मिळालेल्या मराठवाडा भूषण पुरस्काराने परिसरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सर्व क्षेत्रातून होत आहे.

