देवलाल आकोदे
सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
महाराष्ट्रात बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या सुविधा तसेच कामगार कल्याण मंत्रालया मार्फत सुरक्षा संच व कामगारांना संसार बाटली संच मोफत देण्यासह कामगारांच्या पाल्यांना शाळेसाठी,महाविद्यालयीन शिक्षणासाठी व इतर पदवी,पदवीत्तर व ईतर कोर्सेस साठी शिष्यवृत्ती कामगार कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर व ते प्रस्ताव वेळीच तपासणी करून संबंधित बांधकाम कामगार यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते.त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांच्या मुलांच्या विवाहासाठी आर्थिक अनुदान देऊन मदत केली जाते.५ फेब्रुवारी २०२५ पासून ही सर्व कामे जिल्हा बांधकाम सुविधा केंद्रातून कमी करून प्रत्येक तालुक्यात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.नवीन फॉर्म भरणे,रेन्यूअल करणे,शिष्यवृत्ती व इतर आर्थिक मदतीसाठी अर्ज दाखल करणे यासाठी तालुका कामगार कार्यालय काम पाहत असून,तारीख घेऊन ऑनलाइन केलेली कागदपत्रे यात काही त्रुटी आढळल्यास ती रद्द होतात ती रद्द झाल्यानंतर लगेचच सेतू सुधा केंद्र किंवा तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र या ठिकाणी लगेचच पूर्तता करून बांधकाम कामगारांचे प्रश्न निकाली काढणे किंवा निर्णय होवून वेळीच समस्या निवारण होणे गरजेच असून मात्र रिजेक्ट झालेले फॉर्म महिना-महिना जालना जिल्हा कामगार कार्यालयाच्या बांधकाम कामगार साईटच्या ऑनलाईन डेक्सला पेंडींग दाखवतात.त्यामुळे बांधकाम कामगार हे त्यांचे कामधंदे सोडून सेतू सुविधा केंद्र किंवा तालुका कामगार सुविधा केंद्र यावर चकरा मारून मारून परेशान होऊन आर्थिक संकटात सापडत आहे.जिल्हास्तरावरून वेळीच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर रिजेक्ट झालेले फॉर्म त्याचप्रमाणे नूतनीकरणाची चुकलेले फॉर्म वेळीच रिजेक्ट करून लगेच जिल्हा केंद्राने ऑनलाईन एसएमएस द्वारे बांधकाम कामगारांना ताबडतोब कळविले तर बांधकाम कामगारांना आर्थिक फटका बसणार नाही.तसेच त्यांचा वेळ वाचून,त्यांची गैरसोयीही होणार नाही.यासाठी माननीय मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय बांधकाम मंत्री,माननीय जिल्हाधिकारी जालना व माननीय जिल्हा बांधकाम कामगार आयुक्त,जालना यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.जेणेकरून बांधकाम कामगारांना वेळीच सुविधा उपलब्ध होतील.या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन बांधकाम कामगारांची ही अडचण वेळीच सोडविणे गरजेचे व आवश्यक आहे.अशी मागणी जालना जिल्ह्यासह, भोकरदन तालुक्यातील बांधकाम कामगारांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.


