रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात दहिगाव येथील श्रीनाथ वृद्धाश्रमात हिवरखेड येथील गिऱ्हे कुटुंबियांकडून प्रियांशू गिऱ्हे याचा तिसरा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपा सत साजरा करण्यात येवून यादिवशी प्रियांशूला वृद्धां च्या आशीर्वादाचा आणि प्रेमाचा महत्त्वपूर्ण उपहार लाभला. ज्यामुळे गिऱ्हे परिवार भारावून गेला. वृद्धा श्रमात असलेल्या वृद्धांनी प्रियांशूला प्रेमाने आणि आशीर्वादाने शुभेच्छा दिल्या. ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक खास बनला. वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमात गिऱ्हे कुटुंबाकडून एक भव्य भोजनाचा कार्यक्रम आयो जित करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व वृद्धांना स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली, जिथे प्रियांशू आणि त्याच्या कुटुंबा ने वृद्धांच्या सहवासात आनंद अनुभवला. प्रियांशूने अनेक वृद्ध आजी-आजोबा यांच्या सोबत केक कापला आणि त्यांना घास भरविला. ज्या मुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. गिऱ्हे परिवाराने वृद्धाश्रमात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात वृद्धांच्या जीव नात प्रेम आणि स्नेहाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला. प्रियांशूच्या पहिल्या वाढदिवसाला यवतमाळ जिल्ह्यातील उमरी पठार येथील सेवाधाम वृद्धाश्रमाला कुलर देण्यात आले होते, जेणेकरून वृद्धांना गरमीच्या दिवसात थंडावा मिळावा. दुसरा वाढदिवस ओम शांती हिवरखेड येथे वाढदिवस साजरा करण्यात आला होता. प्रियांशूचा तिसरा वाढदिवस दहिगाव येथील श्रीनाथ वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला.ज्यामुळे वृद्धांचे मनोबल उंचावले. गिऱ्हे परिवाराने सर्व वृद्धां सोबत आनंदात सामील होऊन प्रियांशूचा वाढदिवस साजरा केल्याने वृद्धाश्रमात एक स्नेहपूर्ण वातावरण तयार झाले. प्रियांशूच्या वाढ दिवसाच्या या सोहळ्यात वृद्धांच्या प्रेमाने आणि आशी र्वादाने सर्वांना एकत्र आणले. या कार्यक्रमाने वृद्धांना केवळ आनंद दिला नाही, तर त्यांना प्रेम आणि स्नेहाचीही अनुभूती दिली. गिऱ्हे परि वाराचा हा उपक्रम वृद्धाश्रमा तील सर्वांसाठी एक प्रेरणा ठरला. आणि त्यांनी वृद्धां च्या जीवनात आनंदाची एक नवी किरण घालण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.हा प्रेरणादायक उपक्रम केल्या बद्दल श्रीनाथ वृद्धाश्रमाच्या संचालकांकडून प्रियांशूचे वडील राहुल सुरेश गिऱ्हे व आई हर्षदा श्रीफळ देऊन सन्मानित करण्यातआले. गिऱ्हे परिवाराच्या या प्रेरणा दायक पुढाकाराने अनेकांना सामाजिक बांधिलकी जोपा सण्याची प्रेरणा मिळेल एवढे मात्र नक्की.


